अगसगे येथील आंबेडकर गल्लीतील घर कोसळून पाच लाखाचे नुकसान
वार्ताहर/अगसगे
अगसगे येथील आंबेडकर गल्लीतील घरांची पडझड सध्या सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे गल्लीतील शिवपुत्र रामा कोलकार यांच्या घराच्या पाठीमागील भिंती कोसळून यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. रविवार दि.28 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास घराच्या भिंती कोसळल्या आहेत. या ठिकाणीच हे कुटुंब वास्तव्य करीत होते. रात्री जेवण करून हे कुटुंब बाहेर आले होते. यावेळी भिंती कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली भांडी, तांदूळ, जोंधळे व घरगुती साहित्य गेले आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या कुटुंबीयांना आपला उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. दररोज मोलमजुरी करून आपले पोट भरून घेते. याची माहिती मिळतात ग्रा.पं. सदस्य अप्पयगौडा पाटील, गुंडू कोरेनावर, अध्यक्ष अमृत मुद्देनावर यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तरी आता तलाठी, काकती सर्कल व अभियंता यांनी अद्याप पंचनामा केला नाही. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जीवनोपयोगी साहित्य तसेच पडून आहे. तरी ग्रामपंचायतीने व संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.