महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नेपाळमध्ये 5 जण ठार

06:51 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार चिनी नागरिकांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

Advertisement

नेपाळची राजधानी काठमांडूच्या बाहेरील नुवाकोट येथील शिवपुरी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात चार चिनी पर्यटकांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमध्ये चार चिनी नागरिकांसह एकूण पाच जण होते. काठमांडू पोस्टने ही माहिती दिली आहे. टेकऑफनंतर तीन मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.

एअर डायनेस्टीच्या 9एन-एजीडी हेलिकॉप्टरने काठमांडूहून रसुवासाठी बुधवारी दुपारी 1:54 वाजता उ•ाण केले. मात्र, ते गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले. नेपाळ पोलिसांनी याप्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. काठमांडूहून रसुवाकडे निघालेले एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर नुवाकोटच्या शिवपुरी जिल्ह्यात दुर्घटनाग्रस्त झाल्याचे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. पोलिसांनी नुवाकोटच्या शिवपुरी ग्रामीण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमधील अपघातस्थळावरून पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यामध्ये दोन पुऊष, एक महिला आणि पायलटचे मृतदेह सापडले आहेत. गंभीररित्या भाजल्यामुळे एका मृतदेहाची ओळख तातडीने पटू शकली नव्हती.

नेपाळमध्ये यापूर्वी 24 जुलै रोजी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौरी एअरलाईन्सचे विमान कोसळले होते. या अपघातात विमानातील 18 जणांचा मृत्यू झाला असून विमानाचा फक्त पॅप्टनच बचावला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article