For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना मिळणार 5 कोटी

06:50 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना मिळणार 5 कोटी
Advertisement

राज्य शासनाचा निर्णय, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्समधील विजेत्या खेळाडूंना होणार फायदा

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, एशियन व कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तसेच मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याचा राज्यातील खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

शुक्रवारी राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली आहे. राज्य सरकारने या कॅबिनेट बैठकीत तब्बल 41 निर्णयांना मंजूरी दिली आहे. यात राज्य सरकारने महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्या पारीतोषिकाच्या रकमेत वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने आज घेतलेल्या निर्णयानुसार, वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना 3 कोटी रुपये, रौप्य पदकासाठी 2 कोटी, कांस्य पदकासाठी 1 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे 30 लाख, 20 लाख व 10 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

एशियन, कॉमनवेल्थ गेम्समधील पदक विजेतेही होणार मालामाल

एशियन गेमसाठी सूवर्ण पदक विजेत्यांना 1 कोटी रुपये, रौप्य पदकासाठी 75 लाख, कांस्य पदकासाठी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे 10 लाख, 7 लाख पन्नास हजार व 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. कॉमनवेल्थसाठी सूवर्ण पदक विजेत्यांना 70 लाख रुपये, रौप्य पदकासाठी 50 लाख, कांस्य पदकासाठी 30 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे 7 लाख, 5 लाख व 3 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळातील खेळाडूंनाही होणार फायदा

सांघिक खेळात ऑलिंम्पिंक, पॅराआलिंम्पिंकमध्ये सूवर्ण पदक विजेत्यांना 3 कोटी 75 लाख रुपये, रौप्य पदकासाठी 2 कोटी 25 लाख तर कांस्य पदकासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे 37 लाख 50 हजार, 22 लाख 50 हजार व 15 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तसेच सांघिक खेळात एशियन गेममध्ये सूवर्ण पदक विजेत्यांना 75 लाख रुपये, रौप्य पदकासाठी 56 लाख 25 हजार तर कांस्य पदकासाठी 37 लाख 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे 7 लाख 50 हजार, 5 लाख 62 हजार पाचशे रुपये व 3 लाख 75 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

याशिवाय, सांघिक खेळामध्ये वरिष्ठ चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स, यूथ गेम्समध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंनाही मोठी रक्कम देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.

Advertisement
Tags :

.