महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवसृष्टीला गुजरात सरकारकडून पाच कोटीची देणगी

10:13 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुणे : पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नऱ्हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला गुजरात सरकारकडून 5 कोटी ऊपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी स्वीकारली. गुजरात राज्याचे वन व पर्यटनमंत्री मुलू बेरा, पर्यटन सचिव सौरभ पारधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते. याबद्दल अधिक माहिती देताना विनीत कुबेर म्हणाले, शिवसृष्टीच्या ऊपाने महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची इच्छा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 5 कोटी ऊपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपूर्द करण्यात आला. यावेळी पटेल यांना शिवसृष्टीची संपूर्ण माहिती देत या ठिकाणी त्यांनी नक्की भेट द्यावी, असे आग्रहाचे निमंत्रण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना देण्यात आले. या देणगीचा उपयोग शिवसृष्टीच्या कामासाठी करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article