महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्योगपती शिव नाडरांनी दिले 5.90 कोटींचे दान

07:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2023 मधील दररोज दान केल्याची हुरुन इंडिया यादीमधून माहिती : अंबानींची वर्षाला 470 कोटींची देणगी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

एचसीएलचे सहसंस्थापक शिव नाडर यांनी वर्ष 2023 मध्ये दररोज 5.6 कोटी देणगी दिली आहे, अशी माहिती हुरुन इंडिया परोपकार यादीत नाडर, निखिल कामत सर्वात तरुण देणगीदार ठरले आहेत. हुरुन इंडिया परोपकार यादी 2023 गुरुवारी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये एचसीएलचे सहसंस्थापक शिव नाडर यांनी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,042 कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजेच त्यांनी दररोज 5.6 कोटी रुपये दान केले. त्यांच्या खालोखाल विप्रोचे संस्थापक-अध्यक्ष अझीम प्रेमजी आहेत, ज्यांनी 1,774 कोटी रुपयांची देणगी दिली.

नाडर यांनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2,153 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हे दैनंदिन 5.90 कोटी रुपये आहे. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट 2024 गुरुवारी प्रसिद्ध झाली. त्यांच्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष  407 कोटी रुपयांची देणगी दिली. मुख्य 10 देणगीदारांनी 4,625 कोटी रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती आहे. देणगीदारांच्या यादीतील मुख्य 10 व्यक्तींनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये एकत्रितपणे 4,625 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे, जे यादीतील एकूण देणग्यांपैकी सुमारे 53 टक्के इतके आहे. या यादीत कृष्णा चिवुकुला आणि सुष्मिता आणि सुब्रतो बागची यांनी सातवे आणि नववे स्थान पटकावले आहे. टॉप 10 च्या यादीत त्यांची ही पहिलीच एंट्री झाल्याची नोंद आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article