महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विना रेल्वे तिकीटप्रकरणी 5.60 कोटींचा दंड वसूल

12:21 PM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

18 हजार 466 प्रवासी करत होते विनातिकीट प्रवास : तिकिट तपासणी मोहीम तीव्र करणार

Advertisement

पणजी : कोकण रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करताना तीन महिन्यांत तब्बल 5.60 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण 18 हजार 466 प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणीसांनी फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 5 कोटी 60 लाख 99 हजार 17 ऊपयांचा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वे मार्गावर ऑगस्ट ते ऑक्टोबर 2023 पर्यंत एकूण 14150 अनधिकृत व अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला. यातून एकूण 86 लाख 37 हजार 820 ऊपये दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

यात 23 ऑगस्टपर्यंत 4484 विनातिकीट प्रवाशांकडून 26 लाख 67 हजार 555 ऊपये दंड वसूल केला गेला. 23 सप्टेंबरपर्यंत 4888 विनातिकीट प्रवाशांकडून 27 लाख 9 हजार 700 दंड वसूल करण्यात आला. 23 ऑक्टोबरपर्यंत 4778 प्रकरणे नोंद करत 32 लाख 60 हजार 565 ऊपये दंड वसूल केला गेला. नोव्हेंबरमध्ये ही मोहीम अधिक तीव्र करत 7013 जणांवर कारवाई केली गेली  आणि 2 कोटी 5 लाख 52 हजार 445 ऊपये दंड वसूल केला गेला. डिसेंबर महिन्यातही 6,675 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 1 कोटी 95 लाख 64 हजार 926 ऊपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत 18,466 विनातिकीट प्रवाशांकडून 5 कोटी 60 लाख 99 हजार 17 एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल केलेला आहे. सरासरी काढली असता प्रति फुकट्या प्रवाशाकडून 3037 ऊपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पुढील कालावधीत ही तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article