48 हजार वर्षांपूर्वीचा विषाणू जिवंत
रशियातील सायबेरिया हा बर्फाच्छादित प्रचंड प्रदेश अनेक नैसर्गिक आश्चर्यानी भरलेला आहे. त्यामुळे येथे जगभरातील शास्त्रज्ञ निसर्ग संशोधनासाठी येत असतात. येथील बर्फांच्या थराखाली दडलेला 48.5 हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू शोधून काढण्यात संशोधकांना यश आले आहे. हा आतापर्यंत सापडलेला जगातील सर्वात पुरातन जिवंत विषाणू आहे. हजारो वर्षे बर्फाखाली दडलेला असूनही तो जिवंत आहे आणि हेच गूढ शास्त्रज्ञांना उकलायचे आहे.
या संशोधनाची माहिती नुकतीच बायोआर या डिजिटल नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. रशिया, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला. एका सरोवराच्या तळात साठलेल्या बर्फाच्या थराखाली तो सुरक्षित होता. त्याचे नाव झोम्बी व्हायरस असे ठेवण्यात आले आहे. याचा संसर्ग माणसाला होऊ शकतो का, यावरून संशोधन केले जाणार आहे. हा विषाणू धोकादायक नाही, असे आत्ताच म्हणणे धोक्मयाचे ठरू शकते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. याच संशोधनात अशाप्रकारचे 13 पुरातन विषाणू सापडलेले आहेत. सध्या त्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत प्रयोगशाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. ते वातावरणात पसरू नयेत, याची शक्मय ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. ते धोकादायक आहेत किंवा नाही, हे संशोधनांतीच समजणार आहे. या विषाणूचे शास्त्राrय नाव पेंडोरा व्हायरस एडोमा असे आहे. त्याचे नेमके वय शोधण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वी सायबेरियात 30 हजार वर्षे वयाचा विषाणू सापडलेला आहे. पण नवा विषाणू त्याहीपेक्षा जुना असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सध्या वातावरणात उष्णता वाढत आहे. त्यामुळे हजारो वर्षे घट्ट राहिलेले बर्फाचे थर वितळत आहेत. यामुळे या थरांखाली दडलेले विषाणू वातावरणात पसरण्याचा मोठा धोका आहे. हे विषाणू मानवासाठी किंवा जीवसृष्टीसाठी घातक असल्यास जीवसृष्टीला मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही अनेक वैज्ञानिकांनी दिलेला आहे. कारण, या विषाणूंचा प्रतिकार करण्याची मानवाला किंवा अन्य सजीवांना सवय आहे की नाही, हे अद्याप समजायचे आहे. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचे मानण्यात येत आहे.