45 वर्षीय महिलेला बाहुल्यांचा छंद
बाहुल्यांशी खेळणे हा मुलींचा आवडता छंद असतो. परंतु ब्रिटनच्या एका मध्यमवयीन महिलेला बाहुल्यांशी खेळण्याचा छंद जडल्याने तिने 850 बार्बी डॉल खरेदी केल्या आहेत. या डॉल्सची किंमत कळल्यावर धक्का बसेल.
ब्रिटनची सर्वात मोठी बार्बी डॉल लव्हर डॉन ऑस्टिनची कहाणी अत्यंत खास आहे. 45 वर्षीय डॉनकडे 850 हून अधिक बार्बी डॉल्सचा एक विशाल संग्रह आहे. याची किंमत सुमारे 70 लाख रुपये इतकी आहे. प्रारंभी तिने मॅटल कंपनीच्या उत्पादनांवर 34 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली. डॉनसाठी बाहुल्या तिच्या परिवाराच्या सदस्यांप्रमाणे ठरल्या आहेत. डॉनने स्वत:च्या फावल्या वेळेत बार्बी डॉल्सची दुरुस्तीही सुरु केली आहे. यामुळे तिच्या अनेक बाहुल्यांची किंमत आणखी वाढली आहे. तिचे पती स्टीव या छंदाचे समर्थक आहेत. परंतु बाहुल्या कधीच बेडरुममध्ये येणार नाहीत, असा नियम आहे. डॉन यांचा संग्रह वाढल्याने आता जागा कमी पडू लागली आहे. काही बाहुल्या विकण्याचा किंवा घरच बदलण्याचा विचार त्या करत आहेत.
आतापर्यंत लाखो रुपये खर्च
मी स्वत:च्या संग्रहात अशा टप्प्यावर पोहेचले आहे, जेथे मला काही बाहुल्या विकण्याचा किंवा घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे डॉन यांनी सांगितले. त्यांचा संग्रह सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे. मॅटल कंपनीने बार्बीच्या 65 व्या वर्धापनदिनी त्यांना खास भेटवस्तू पाठविली. डॉन स्वत:च्या बाहुल्यांना धूळ आणि नुकसानीपासून वाचविण्यासाठी ग्लास पॅबिनेट्समध्ये सजवितात. स्टीव मला बार्बी कॉन्व्हेंशन्समध्ये न्यायचे आणि माझ्यासोबत बाजारपेठ तसेच चॅरिटी शॉप्समध्ये बाहुल्यांचा शोध घ्यायचे, असे डॉन सांगते. डॉनला एका टॉय शोमध्ये केवळ 10 पाउंडमध्ये एक ओरिजिनल ब्लॅक बार्बी मिळाली. तिच्या संग्रहात जपानी एक्सक्लूसिव स्किपर, एक दुर्लभ कोरियन वंडर वुमन आणि सुमारे 6 हजार पाउंडचे मूल्य असलेली पोनीटेल बार्बी नंबर टू यासारख्या खास बाहुल्या सामील आहेत.