For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मक्केला गेलेले 45 भारतीय यात्रेकरू ठार

06:55 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
मक्केला गेलेले 45 भारतीय यात्रेकरू ठार
Advertisement

मदीनेला जाताना प्रवासी बस टँकरवर आदळल्याने दुर्घटना : सर्व मृत हैदराबादमधील

Advertisement

► वृत्तसंस्था / रियाध (सौदी अरेबिया)

भारतातील हैदराबाद शहरातील 45 ‘उमराह’ यात्रेकरु सौदी अरेबियात झालेल्या भीषण अपघातात ठार झाले असून हा अपघात ते मक्केहून मदीनेला जात असताना त्यांची बस टँकरवर आदळल्याने झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. हा अपघात सौदी अरेबियातील मुफ्रीहाट येथे झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

या दुर्घटनेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आवश्यक ते सर्व साहाय्य अपघातग्रस्तांना करा, अशी सूचना सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे असलेल्या भारतीय दूतावासाला करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अपघाताचे वृत्त समजताच सौदी अरेबियाच्या आपत्ती निवारण दलांनी घटनास्थळी जाऊन साहाय्यता कार्याचा प्रारंभ केल्याची माहिती देण्यात आली.

नेमके कारण अद्याप अस्पष्ट

हा अपघात नेमका कसा घडला हे अद्याप अस्पष्ट आहे. चौकशीनंतरच ते समजू शकेल, असे सौदी प्रशासनाने स्पष्ट केले. उपलब्ध माहितीनुसार हे यात्रेकरु मक्केची यात्रा आटोपून मदीनेला चालले होते. मक्का ते मदीना मार्गावर या बसची समोरुन भरधाव येणाऱ्या डिझेलच्या टँकरशी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, बसचे तुकडे-तुकडे झाले. प्रवासी बसमधून उडून बाहेर पडले. कित्येक प्रवाशांचा भूमीवर आदळल्याने जागीच मृत्यू झाला. या बसमधून प्रवास करणाऱ्यांपैकी केवळ एक चालक वाचला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जखमीवर मक्केतील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून साहाय्यासाठी दूरध्वनी लाईन्स उघडण्यात आल्या आहेत. ठार झालेल्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सौदी प्रशासनाने भारताला कळविले आहे.

दूतावास अधिकारी कार्यरत

जेद्दाह येथील भारतीय दूतावास या घटनेनंतर त्वरित सक्रीय झाला असून 24 बाय 7 काम करणारा नियंत्रण कक्ष या दूतावासाकडून स्थापन करण्यात आला आहे. नातेवाईकांना संपर्कासाठी टेलिफोन क्रमांक आणि टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या भारतीय दूतावासाने वृत्तपत्रे आणि सोशल मीडिया यांच्यासाठी वक्तव्य प्रसारित केले असून दूतावासाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती त्यात देण्यात आली आहे. अनेक नातेवाईकांनी संपर्क केलेला आहे.

जयशंकर यांना दु:ख

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या अपघातासंबंधी अतीव दु:ख व्यक्त केले आहे. रियाध येथील भारतीय दूतावास आणि जेद्दाह येथील भारतीय व्यापारी दूतावास यांच्याकडून जखमींना शक्य तितके साहाय्य केले जात आहे. तसेच अपघातग्रस्तांच्या भारतातील कुटुंबियांशी संपर्क स्थापित करण्यासाठी साहाय्य केले जात आहे, अशी माहितीही जयशंकर यांनी पत्रकारांना दिली.

अपघातग्रस्तांची माहिती देण्याचा आदेश

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रे•ाr यांनी या घटनेमुळे त्यांना धक्का बसल्याचे प्रतिपादन केले आहे. सर्व अपघातग्रस्तांची माहिती संकलित करण्याचा आदेश त्यांनी राज्याचे मुख्य सचिव के. रामकृष्ण राव आणि पोलीस महासंचालक बी. शिवधर रे•ाr यांना दिले आहेत. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला जात आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

एकाच कुटुंबातील 18 जण ठार

अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांची नेमकी संख्या अद्याप समजलेली नाही. ती माहीत करुन घेण्यासाठी रियाध येथील प्रशासनाशी संपर्क करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत अपघाताची सविस्तर माहिती हाती येईल, अशी अपेक्षा भारतीय दूतावासाने व्यक्त केली आहे. ज्या बसमधून हे प्रवासी जात होते, त्या प्रवास कंपनीशी संपर्क करण्यात आला आहे. कंपनीनेही माहिती संकलित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या अपघात हैदराबाद येथील एका कुटुंबातील 18 व्यक्ती ठार झाल्या आहेत. तर याच शहरातील अन्य एका कुटुंबातील 5 व्यक्ती ठार झाल्या आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अपघातस्थळी भीषण दृश्य

ड अपघातस्थळी मृत आणि जखमीचे अवयव तुटून पडल्याचे भीषण दृष्य

ड अपघातानंतर अनेक तास मार्गावरील वाहतूक बंद, त्वरित साहाय्यकार्य

ड भारताचे दूतावास सक्रीय, कुटुंबियांना संपर्कासाठी दूरध्वनी लाईनची सोय

Advertisement
Tags :

.