नव्या वर्षात जिह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणार
पुढील महिन्यापासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू
'गुगल अर्थ'द्वारे प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करण्याच्या तहसीलदारांना सुचना
सप्ताहभरात तलाठी, ग्रामसेवक करणार संयुक्त पाहणी.
कोल्हापूर : प्रकाश सांडुगडे
विधानसभेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच कोल्हापूर जिह्यातील मुदत संपणाऱ्या 433 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचे वेळापत्रक अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक गाव पुढाऱ्यांनी प्रभाग रचना कशी असावी, याचा अभ्यास करण्यात सुरुवात केली आहे. येत्या वर्षभरात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. नववर्षात 24 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावयाची आहे. या 438 ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींची मुदत 2019 मध्येच संपली होती. परंतु त्याच दरम्यान कोरोनाची लाट असल्याने आणि आरोग्य सेवा वगळता सर्व कामकाज ठप्प असल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका 2020 मध्ये घेण्यात आल्या. जानेवारी ते डिसेंबर 25 मध्ये पाच वर्षांची मुदत संपणाऱ्या 433 ग्रामपंचायती असून त्यांच्या निवडणुका काही टप्प्यांमध्ये पुढील वर्षी घेण्यात येणार आहेत.
पुढील वर्षी टप्प्याटप्प्याने मुदत संपणाऱ्या तालुकावार ग्रामपंचायती अशा :
शाहूवाडी : मांजरे, कुंभवडे, केर्ले/हुंबवली, परळे कोदे, पणंद्रे, पेरीड गाडेवाडी, ससेगाव, थेरगाव, उकोली, वारूळ, आंबा, बुरंबाळ, गजापूर विशाळगड, गिरगाव, गोंडोली, जांबूर मालगाव, कांडवण, मानोली, मोळावडे, नांदारी, नेर्ले, परळी, परळे निनाई, पाटणे, सावर्डे बु., सवते, शिराळे तर्फ मलकापूर, शित्तूर तर्फ मलकापूर, शित्तूर तर्फ वारूण, सोनुर्ले, सानेवडे, थावडे, वाडीचरण, नांदगाव, पेंडाखळे, शिंपे, शिरगाव, सोंडोली, वडगाव, अणुस्कुरा, मोसम.
पन्हाळा : पोंबरे, जाफळे, माजनाळ, धबधबेवाडी, सोमवार पेठ, बुधवार पेठ, नावली, इंजोळे, आवळी, नणुंद्रे, कणेरी, केखले, दिगवडे, उर्डी, वारणूळ, पोर्ले तर्फ ठाणे, कसबा कोडोली, कळे, पैजारवाडी, जेऊर, आरळे, घानवडे, तेरसवाडी, पोहोळे तर्फ बोरगाव, पुनाळ, आंबार्डे, सातार्डे, हरपवडे, निवडे, म्हाळुंगे तर्फ बोरगाव, नेबापूर, पोखले, वाघवे, तिरपण, पोहाळवाडी, पुशिरे तर्फ बोरगाव, तेलवे, निकमवाडी, उत्रे, सावर्डे तर्फ सातवे, मोहरे, कसबा सातवे, देवाळे, देवाळे, आपटी.
चंदगड : चिंचणे, बसर्गे, बागिलगे, बोंजुर्डी, दाटे, दिंडलकोप, धुमडेवाडी, हाजगोळी, इब्राहिमपूर, कळसगादे, कानडी, करेकुंडी, किटवाड, म्हाळेवाडी, मलतवाडी, मुगळी, नागवे, नांदवडे, राजगोळी बु., सुंडी, सुरूते, शिनोळी खुर्द, तुडीये, आसगाव, बुक्कीहाळ, देवरवाडी, घुल्लेवाडी, केरवडे, किणी, माडवळे, तावरेवाडी, मांडेदुर्ग, हलकर्णी, ढोलगरवाडी, होसूर, कालकुंद्री, कौलगे, कोवाड, पाटणे, पुंद्रा, जांबरे.
आजरा : मुमेवाडी, महागोंड, निंगुडगे, सुळे, हात्तिवडे, चिमणे, बेलेवाडी हु., हालेवाडी, कासार कांडगाव, पेद्रेवाडी, होनेवाडी, किणे, सरोळी, चव्हाणवाडी, जाधेवाडी, खोराटवाडी, देवकांडगाव, हाळोली, गवसे, एरंडोळ, मलिग्रे, सिरसंगी, मुरूडे, देवर्डे, वाटंगी, कोवाडे.
भुदरगड : कलनाकवाडी, पाचर्डे, पांगिरे, म्हसवे, सालपेवाडी, नांदोली, बारवे, बेडीव, एरंडपे खेडगे, खानापूर, डेळे चिवाळे, तांब्याचीवाडी, नवले, नवरसवाडी, नागनवाडी, नाधवडे, पळशिवणे, पाटगाव, फणसवाडी, बसरेवाडी, बिद्री पेठशिवापूर, बेगवडे, भालेकरवाडी, मठगाव, मेघोली, लोटेवाडी, हेळेवाडी, ममदापूर, मिणचे खुर्द, आदमापूर, आंबवणे, दोनवडे, पंडिवरे, मुरूक्टे, मोरेवाडी, म्हासरंग, वासनोली, गंगापूर, नितवडे, पाळ्याचा हुडा, बामणे, भेंडवणे, शिवडाव, सोनुर्ली, नांगरगाव.
गडहिंग्लज : जांभूळवाडी, जरळी, लिंगनूर, मांगूर तर्फ सावंतवाडी, ऐनापूर, अरळगुंडी, बुगडीकट्टी, चन्नेकुपी, चिंचेवाडी, दुगुनवाडी, दुंडगे, हलकर्णी, हानिमनाळ, हसूरचंपू, हेब्बाळ जलद्याळ, हेब्बाळ क. नूल, हिरलगे, हुनगीनहाळ, इदरगुची, क. नूल, खणदाळ, लिंगनूर नूल, माद्याळ क. नूल, मनवाड, मासेवाडी, मुत्नाळ, नंदनवाड, नरेवाडी, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, तळेवाडी, तेगीनहाळ, तेरणी, वडरगे, वाघराळी, औरनाळ, बेळगुंदी, गिजवणे, हरळी बु, इंचनाळ, कानडेवाडी, मुंगुरवाडी, निलजी, नौकूड, सावंतवाडी, शेंद्री, तुपुरवाडी, उंबरवाडी, बसर्गे बु. चंदनकूड,
करवीर : न्यू वाडदे, तामगाव, कुर्डू, भूयेवाडी, बालिंगे, खुपिरे, सांगवडे, हलसवडे, खांटागळे, गिरगाव, निगवे दुमाला, वाडीपीर, देवाळे, आडूर, कोपार्डे, कुडित्रे, कोगिल खु, नंदगाव, कळंबे तर्फ कळे, उपवडे, रजपूतवाडी, वडकशिवाले, कोगिल बु., इस्पुर्ली, म्हालसवडे, आरे, पाटेकरवाडी, शिये, चाफोडी, नागदेववाडी, हळदी, पाडळी खुर्द, येवती, भामटे, केर्ली, आमशी, गर्जन, सडोली खा., मुडशिंगी, गाडेगोंडवाडी, साबळेवाडी, कोथळी, बेले, शिंदेवाडी, कोगे, बाचणी, महे, कुरूकली, पडवळवाडी, म्हारूळ, हणमंतवाडी, खेबवडे.
राधानगरी : राजापूर, कंथेवाडी कंळकवाडी, गवशी, बुरंबाळी, चाफोडी तर्फ ऐनघोल, कोनोली तर्फ असंडोली, कोदवडे, पंडेवाडी, हेळेवाडी, तळाशी, पनोरी, बुजवडे, गुडाळ गुडाळवाडी, खिंडी व्हरवडे, नरतवडे, आणाजे, ऐनी, म्हासुर्ली.
गगनबावडा : गगनबावडा, लोंघे, कातळी, सांगशी, वेतवडे, असंडोली, किरवे, मुटकेश्वर खडूळे.
हातकणंगले : दुर्गेवाडी, वठार तर्फ वडगाव, खोची, बिरदेववाडी, कुंभोज, नेज, हालोंडी, जंगमवाडी, चंदूर, कबनूर, माणगाव, माणगाववाडी, रूई, लाटवडे, मिणचे, तासगाव, किणी, मनपाडळे, पाडळी, वाठार तर्फ उदगाव, तिळवणी.
कागल : अर्जुनी, उदंरवाडी, चिखली, मळगे बु., व्हन्नूर, कुरूकली, बानगे, हासूर खुर्द, बेलवळे बु., एकोंडी, शंकरवाडी, बिद्री, हळदी, आलाबाद, तमनाकवाडी, करंजिवणे, वडगाव, बस्तवडे, केनवडे, शिंदेवाडी, शेंडूर, करनूर, म्हाकवे, लिंगनूर दुमाला, मेतके, मळगे खुर्द, साके, कासारी, सिद्धनेर्ली, बोळावीवाडी, हळदवडे, बेनिक्रे, लिंगनूर कापशी, गोरंबे, भडगाव, कौलगे, यमगे, कुरणी, वाळवे खुर्द, बेलवळे खुर्द, पिंपळगाव बु., सानगे, गलगले, खडकेवाडा, केंबळी, मौजे सांगाव, सुळकूड, बेलेवाडी मासा, सावर्डे बु., माद्याळ, मांगनूर, सोनाळी, वंदूर.
शिरोळ : आलास, गौरवाड, गणेशवाडी, जैनापूर, तमदलगे, निमशिरगाव, बुबनाळ, शिरटी, शेडशाळ, उदगाव, घोसरवाड, जुने दानवाड, तेरवाड, नृसिंहवाडी, नांदणी, बस्तवाड, मजरेवाडी, शिरदवाड, अर्जुनवाड, कोंडिग्रे, कोथळी, कुटवाड, कवठेगुलंद, घालवाड, चिपरी, दानोळी, हसूर, जांभळी, टाकळीवाडी, दत्तवाड, धरणगुत्ती, यड्राव, शिरढोण.