रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये 41 ठार
वृत्तसंस्था / कीव्ह
रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने मंगळवारी किमान सहा क्षेपणास्त्रे डागली असावीत असे अनुमान आहे. युव्रेनचे नेते झेलेन्स्की यांनी हा हल्ला झाल्याचे मान्य केले असून हल्ला पिडित नागरीकांच्या साहाय्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
रशियाच्या क्षेपणास्त्रांपैकी दोन क्षेपणास्त्रे युक्रेनमधील एका रुग्णालयावर आणि एका शिक्षणसंस्थेवर पडल्याने मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. रुग्णालयातील अनेक रुग्ण या हल्ल्यात दगावल्याची शक्यता आहे. या हल्ल्यांमध्ये 180 हून अधिक नागरीक जखमी झाले असून त्यांच्यापैकी अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात युव्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या भागात 15 किलोमीटर आतपर्यंत मुसंडी मारली होती. मात्र, नंतरच्या चार दिवसात रशियाने हा हल्ला परतविला असून आता रशिया वरचढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
चौकशीचा आदेश
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या चौकशीचा आदेश युक्रेनचे नेने झेलेन्स्की यांनी मंगळवारी दिला आहे. युक्रेनची क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा का अपयशी ठरली, याची चौकशी केली जाणार असून भविष्यकाळात यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. युक्रेनने आणखी सबळ क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा पुरविली जावी, अशी मागणी अमेरिका आणि युरोपियन देशांकडे पेलेली आहे. तथापि, ती अद्याप मान्य झालेली नाही. आता या हल्ल्यानंतर ती मान्य होईल, अशी शक्यता आहे.