मधमाशांचे 400 डंख ; वृद्धास जीवदान
कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) मधमाशांच्या चाव्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धास बरे करण्यात येथील डॉक्टरांना यश आले. उपचारासाठी दाखल केले तेंव्हा वृद्धाच्या शरीरात सुमारे 400 डंख झाले होते. त्यांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या. सलग एक महिना उपचार करून 7 डायलेसिस करण्यात आले. सीपीआरमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून जीवदान दिले असल्याच्या भावना वृद्धाच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.
याबाबत सीपीआर प्रशासनाकडून दिलेली माहिती अशी, गत महिन्यात विलास ज्ञानू पाटील (रा. पाटणे, ता. शाहूवाडी) हे फिरायला गेले असता मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यांना पळता न आल्याने त्यांच्या शरीरावर 400 डंख झाले होते. प्रारंभी त्यांना बांबवडे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले. सीपीआरमध्ये दाखल केले तेंव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या नाकात दोन मधमाशा आढळून आल्या. येथील डॉक्टरांनी तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरू केले.
त्यांना औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. विभाग प्रमुख डॉ. बुद्धीराज पाटील यांनी सर्व तपासण्या केल्या असता सर्वत्र सुज आढळुन आली. नंतर काही दिवसातच त्यांना लघवीचा त्रास होऊ लागला. त्यांची रक्ताची तपासणी केली असता ऱ्दस्aत् असलेले एाrल्स् ण्rाatग्हग्हा काही दिवसातच सात पटीने वाढून 9.2 पर्यंत पोहचले. त्यांच्या किडण्याचे कार्य थांबल्याने धोका निर्माण झाला होता.
डॉ. पाटील व त्यांच्या टिमने तत्काळ अत्ब्sग्s उपचार पध्दती सुरू केली. सलग तीन दिवस व त्यानंतर एक दिवस आड अशा एकूण सात वेळा अत्ब्sग्s करुन किडनी कार्यान्वित करण्यात आली. आता रुग्णाचे एाrल्स् ण्rाatग्हग्हा पुर्ववत 1.4 वर पोहचले आहे. सर्व उपचारासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. शनिवार दि.4 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी सीपीआरमधील उपचारामुळे समाधान व्यक्त करत सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे व विभागप्रमुख डॉ. अनिता परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3 चे प्रमुख डॉ. बुध्दीराज पाटील, डॉ. मंगेश शिंदे, डॉ. सागर बडवाईक, डॉ. रेणूका माटे, डॉ. सचिन गोदारा, डॉ. सौरभ डोंगरे, डॉ. अदित्य लांडे यांनी परिश्रम घेतले. महेश कोळी व उमेश कांबळे यांचे सहकार्य लाभले.
सर्व उपचार मोफत
सदर रूग्णावर डॉक्टरांच्या टिमने एक महिना उपचार केले. सर्व उपचार मोफत करण्यात आले. सीपीआरमध्ये आणखी तीन रूग्ण दाखल झाले आहेत. यातील एका रुग्णाची स्थिती गंभीर आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मधमाशांपासून दुर रहा, चावा घेतल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, सीपीआर
सीपीआरमधील डॉक्टरांचे यश
रूग्णाची स्थिती फार गंभीर होती. रूग्णाचे एाrल्स् ण्rाatग्हग्हा सात पटीने वाढले होते. त्यामुळे किडण्यांचे कार्य थांबले होते. औषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांच्या टिमने यशस्वी उपचार करून धोकादायक स्थितीतून बाहेर काढले.
डॉ. बुद्धीराज पाटील, औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख