हॉकी शिबिरासाठी 40 जणांची निवड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
23 आणि 24 ऑक्टोबर रोजी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर यजमान भारत आणि जर्मनी यांच्यात दोन सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. यामालिकेसाठी पूर्व तयारी करण्याकरिता हॉकी इंडियाने राष्ट्रीय सराव शिबिर 1 ऑक्टोबरपासून बेंगळूरात सुरू केले आहे. या सराव शिबिरासाठी 40 संभाव्य हॉकपटूंची निवड करण्यात आली आहे. सदर शिबिर 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे.
अलिकडेच भारतीय पुरुष हॉकी संघाने निश्चितच आपला दर्जा सुधारल्याचे जाणवते. हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविले आहे. तसेच चीनमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने जेतेपद पुन्हा स्वत:कडे राखले आहे.
विश्व चॅम्पियन जर्मनी संघाबरोबर होणाऱ्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी चांगलेच झगडावे लागेल, असा अंदाज आहे. हे दोन सामने भारतात होणार असल्याने त्याचा लाभ निश्चितच यजमान संघाला मिळेल.
संभाव्य संघ- गोलरक्षक- कृष्णन बहाद्दुर पाठक, पवन, सुरज करकेरा, मोहीत, बचावफळी-जर्मनप्रितसिंग, अमित रोहीदास, हरमनप्रित सिंग, सुमित, संजय, जुगराज सिंग, अमनदीप लाक्रा, निलम संजीब झेस, वरुणकुमार, यशदीप सिवाच, दीपसेन तिर्की, मनदीप मोर, मध्यफळी-राजकुमार पाल, समशेर सिंग, मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेकसागर प्रसाद, निलकांत शर्मा, एम. रवीचंद्र सिंग, मोहम्मद मुसेन, विष्णूकांत सिंग, राजेंद्र सिंग, सी. बी. पुवन्ना, आघाडी फळी-अभिषेक, सुखजितसिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरुजंत सिंग, अंगड वीरसिंग, आदित्य लालगे, बॉबी सिंग धामी, सुदीप चिरमाको, कार्ती, मनिंदर सिंग, शीलानंद लाक्रा आणि दिलप्रितसिंग.