महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंध्रात मच्छिमारांच्या 40 बोटी जळून खाक

06:35 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

Advertisement

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात आगीची दुर्घटना सोमवारी घडली. प्रथम एका बोटीला आग लागल्यानंतर ती हळूहळू 40 बोटींमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्मयात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मच्छिमारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement

विशाखापट्टणममधील विझाग बंदरात रात्री उशिरा भीषण आग लागली. बंदरावर नांगरलेल्या जवळपास 40 यांत्रिक मासेमारी नौका भीषण आगीत नष्ट झाल्या. या घटनेत बोटीत ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरचाही जोरात स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे मच्छिमार आणि स्थानिक पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article