परदेशी चित्रपट निर्मितीसाठी 40 कोटींची तरतूद
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा : भारतीय चित्रपट सामग्रीसाठी 5 टक्के बोनसचे आश्वासन,नऊ दिवशीय भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु
पणजी : मध्यम आणि मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्पांना देशात आकर्षित करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. विदेशी चित्रपटांची निर्मिती भारतात व्हावी आणि त्याचा फायदा देशाला तसेच भारतातील कलाकारांना व्हावा, यासाठी केंद्र सरकार चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. विदेशी चित्रपट निर्मिती सुव्यवस्थित करण्याच्या आणि भारतात व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यामुळे परदेशी चित्रपट निर्मितीसाठी 30 कोटीवरून 40 कोटी ऊपयांची आर्थिक तरतूद करण्यात येईल. शिवाय भारतीय चित्रपट सामग्रीसाठी अतिरिक्त 5 टक्के बोनस देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे 54 व्या इफ्फी महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री ठाकूर बोलत होते. यावेळी केंद्रीय मत्स्य व पशुपालन खात्याचे मंत्री डॉ. एल. मुऊगन, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, चित्रपट निर्माते करण जोहर, अभिनेता सनी देवल, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदी उपस्थित होते. मंत्री ठाकूर म्हणाले, विदेशी चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन योजना भारताने गेल्या वर्षी कान्समध्ये जाहीर केली होती, जी देशातील चित्रपट निर्मितीसाठी 2.5 कोटी ऊपयांपर्यंतच्या खर्चाच्या 30 टक्क्यांपर्यंत परतफेड देते. चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी यात बदल करण्यात आला असून, ही रक्कम 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
1 एप्रिल 2022 नंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केवळ माहितीपटांसाठी शूटिंगची परवानगी दिलेली आंतरराष्ट्रीय निर्मिती या प्रोत्साहन योजनेसाठी पात्र राहणार आहे. अंतरिम आणि अंतिम अशा दोन टप्प्यात प्रोत्साहन वितरीत केले जाईल. भारतात प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंतिम वितरणाचा दावा केला जाऊ शकतो. विशेष प्रोत्साहन मूल्यमापन समितीच्या शिफारशीनुसार प्रोत्साहन दिले जाईल. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अंतर्गत स्थापन करण्यात आलेले चित्रपट सुविधा कार्यालय ही प्रोत्साहन योजना राबवत आहे, असेही मंत्री ठाकूर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील घोषणा ही अर्थव्यवस्थेला चालना देणे, रोजगार निर्माण करणे आणि देशातील पर्यटन आणि संस्कृतीला चालना देणे असा उद्देश आहे. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि पोस्ट-प्रॉडक्शन सेवा सारख्या सूर्योदय उद्योगांनाही चित्रपट क्षेत्रातील अलीकडील उपक्रमांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे, असेही मंत्री ठाकूर यांनी सांगितले.
गोव्याला चित्रपट सृष्टीचे हब बनविण्याच्या दिशेने प्रयत्न : मुख्यमंत्री
गोव्याला चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्याला चित्रपट अनुकूल स्थळ म्हणून चालना देण्यासाठी मदत करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले इफ्फी ही जगातील 14 वी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा आहे आणि गोवा 2004 पासून महोत्सवाचे यशस्वी आयोजन करत आहे. गोव्यात फास्ट ट्रॅक आणि कालबद्ध पद्धतीने फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणाही सावंत यांनी केली.
‘कॅचिंग डस्ट’ने ‘इफ्फी’ सुरू
चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते. त्याचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारेही येत आहे. ज्या महोत्सवाचा आनंद लुटण्याची प्रतीक्षा रसिकांना लागून राहिली होती, त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्यात शानदार सुरवात झाली असून, यंदाच्या 54 व्या महोत्सवात ‘कॅचिंग डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटाने सुरवात करण्यात आली. राज्यात दाखल झालेल्या हजारो रसिक, चित्रपट निर्माते, कलाकार, नृत्य कलाकार, संगीत कलाकार यांनी या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटात आकर्षक कथानकाने मानवी भावनांना जोडणारी भावना कायम ठेवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चित्रपटाच्या आकर्षक कथानकाने अनोख्या दृश्य कलात्मकतेसह, चित्रपटाचा एक विलक्षण प्रवास दाखवला. महोत्सवाला सुरवात करताना ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाचे उद्घाटन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुऊगन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर चित्रपट कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने सन्मान
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) अभिनेत्री माधुरी दीक्षितला भारतीय चित्रपटातील योगदानासाठी ‘विशेष’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चार दशकांच्या उल्लेखनीय कारकिर्दीसह माधुरी दीक्षितने भारतीय चित्रपट उद्योगावर अमिट छाप सोडल्याने केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनयाला जिवंत करण्याच्या माधुरी दीक्षितच्या क्षमतेने पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘भारतीय सिनेमातील योगदानासाठी विशेष ओळख’ पुरस्कार हा माधुरी दीक्षितच्या अपवादात्मक कामगिरीचा आणि भारतीय सिनेमावरील तिच्या कायम प्रभावाचा पुरावा आहे. 1980, 90 आणि 2000 च्या दशकाच्या सुऊवातीच्या हिंदी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तिला विक्रमी चौदा वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. माधुरी दीक्षितने ‘अबोध’ (1984) मधून चित्रपटात पदार्पण केले आणि ‘तेजाब’ (1988) द्वारे तिला व्यापक लोकमान्यता मिळाली. 2014 मध्ये तिची भारतातील युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाली होती.
किरण ठाकुर यांच्या शुभेच्छा
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘कॅचिंग डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटाने 54 व्या इफ्फीचा प्रारंभ झाला. याशिवाय या महोत्सवात इतर कलाकारांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी तऊण भारत समूहप्रमुख तथा दै. ‘तऊण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली. त्यांनी गोव्यातील प्रमुख नेते व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधून त्यांना इप्फी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.