40 रंगांनी नटलेले खोरे
जगात सुंदर दृश्य असणाऱ्या ठिकाणांपैकी काही ठिकाणं ही माणसांमुळे निर्मित झाली आहेत. परंतु एका ठिकाणाच्या निर्मितीत निसर्गासोबत मानवी चूक देखील कारणीभूत आहे. दक्षिणच्या ग्रँड कॅन्यन किंवा प्रोविडेन्स कॅनन जॉर्जियामध्ये असाच इक चमत्कार आहे, जो सौंदर्य आणि इतिहासाने भरलेला आहे.
प्रोविडेन्स व्हॅली केवळ सुंदर नसून निसर्गाच्या शक्तीचा पुरावा देखील आहे. हे नैसर्गिक आश्चर्य लाखो वर्षामध्ये नदीद्वारे पर्वत कापून तयार झालेले नाही. तर 1800 च्या दशकात शेतीच्या खराब पद्धतींमुळे हे निर्माण झालेले आहे. आज या खोल दऱ्या आणि रंगीत खोऱ्याच्या भिंती जिवंत प्रदर्शनाच्या स्वरुपात उभ्या असून त्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.
हे खोरे नवे असून याची निर्मिती 19 व्या शतकात झाली होती. लोकांनी शेतीसाठी जंगल तोड केली, यामुळे पावसात माती वाहू लागली आणि नाले निर्माण झाले, यातील काही 150 फूटांपेक्षा अधिक खोल नाले आहेत. प्रोविडेन्स कॅननचे सर्वात खास वैशिष्ट्या म्हणजे याच्या रंगीत भिंती आहेत. भिंती गडद लाल आणि नारिंगीपासून गुलाबी तसेच जांभळ्या रंगाच्या येथे भिंती आहेत. हा रंग माती वाहून गेल्याने समोर आलेल्या खनिजांमुळे प्राप्त झाला आहे. खोऱ्याच्या भिंतींमध्ये हा रंग आयर्न ऑक्साइडमुळे प्राप्त झाला आहे. आयर्न ऑक्साइडमुळे मातीला लाल रंग प्राप्त झाला आहे. तर अन्य खनिज दुसरे रंग प्रदान करतात. खोऱ्याच्या भिंतींमध्ये 40 हून अधिक वेगवेगळे रंग दिसून येतात.
पर्यावरण क्षरणामुळे निर्मिती होऊनही प्रोविडेनस कॅन्यन आता रोपे आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे घर आहे. हे क्षेत्र एक उत्तम पर्यावरणीय तंत्र ठरले आहे. यात अनेक प्रजाती खोऱ्याच्या अनोख्या वातावरणाच्या अनुकूल झाल्या आहेत. उन्हाळ्यात फुलणाऱ्या प्लमजीफ एजेलियाच्या दुर्लभ प्रजाती या खोऱ्यातच आढळून येतात. खोऱ्यात विविध प्रकारचे वन्यजीव देखील असून यात कोल्हा, हरिण आणि अनेक पक्षी प्रजाती सामील आहेत.
प्रोविडेन्स कॅन्यनमध्ये शोध घेणाऱ्यांसाठी अनेक पायी मार्ग आहेत. प्रवाशांसाठी 10 मैलापेक्षा अधिक लांबीचे पायी मार्ग आहेत. यात सहज चालता येण्यापासुन अधिक आव्हानात्मक मार्ग देखील आहेत. सर्वात लोकप्रिय मार्गांपैकी एक कॅन्यन लूप ट्रेल असून तो 2.5 मैल अंतराचा आहे. तेथे खोऱ्याच्या रंगीत भिंतींना जवळून पाहता येते.