For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : सांगलीत 4 वर्षीय अफानला ‘पुनर्जन्म’; उमर गवंडी व मेहता हॉस्पिटलचा अनमोल प्रयत्न

03:12 PM Nov 20, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   सांगलीत 4 वर्षीय अफानला ‘पुनर्जन्म’  उमर गवंडी व मेहता हॉस्पिटलचा अनमोल प्रयत्न
Advertisement

                    सांगलीत बालकाचा जीव वाचवणारा रात्रभर संघर्ष

Advertisement

सांगली : 4 वर्षांचा लहान अफान मुल्ला या बालकाला मेहता हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उमर गवंडी यांच्या अथक प्रयत्नांमुळे अक्षरशः पुनर्जन्म मिळाला आहे.

अफान हा खेळत असताना एका अनोळखी दुचाकीस्वाराच्या धडकेत जखमी झाला होता. सुरुवातीला किरकोळ दुखापत असल्याचं वाटलं, मात्र काही तासांनंतर त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सिटीस्कॅनमध्ये किडनी फाटल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत असा सल्ला दिला, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.

Advertisement

या कठीण प्रसंगी अफानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे उमर गवंडी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ पुढाकार घेत मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी व्यवस्था केली. गवंडी यांच्या प्रयत्नांमुळे रात्री अडीच वाजता हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. तन्मय मेहता, सीनियर सर्जन डॉ. अजित मेहता आणि सीनियर बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद घाटगे यांच्या नेतृत्वाखाली १५ जणांची डॉक्टरांची टीम उपचारासाठी सज्ज झाली.

अत्यंत नाजूक अवस्थेत असलेल्या अफानवर संपूर्ण रात्रभर उपचार सुरू राहिले. डॉक्टरांच्या तात्काळ आणि कौशल्यपूर्ण उपचारांमुळे बाळाने हळूहळू प्रतिसाद दिला. अखेर ऑपरेशनशिवायच किडनी पुन्हा कार्यरत झाली. मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व उपचार मोफत करण्यात आले.

सध्या अफानची तब्येत ठणठणीत असून त्याच्या पालकांनी उमर गवंडी आणि मेहता हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मिळालेली ही मदत आणि उमर गवंडी यांचा पुढाकार हे मानवतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Advertisement
Tags :

.