For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 4 हजार विशेष अतिथी होणार सामील

06:42 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 4 हजार विशेष अतिथी होणार सामील
Advertisement

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाची फूल ड्रेस रिहर्सल : भारत मंडपम येथून तिरंगा बाईक रॅली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील लाल किल्ल्यावर मंगळवारी फूल ड्रेस रिहर्सल पार पडली असून यात सैन्याच्या जवानांनी मॉक ड्रिल केली. वायुदलाने देखील आकाशात स्वत:चे सामर्थ्य दाखवून दिले आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ही विकसित भारत आहे. याच्या अंतर्गत स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. तर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात युवा, महिला आणि आदिवासींसमवेत 4 हजार विशेष अतिथी सामील होणार आहेत.

Advertisement

केंद्र सरकारकडून जारी यादीत विशेष अतिथींना 11 श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. सर्व अतिथी 14 ऑगस्ट रोजी दिल्लीत पोहोचणार आहेत. हे अतिथी स्वत:सोबत कुटुंबातील एका सदस्यासोबत आणू शकतात. याचबरोबर 18 हजार ई&-निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. 150 महिला सरपंचांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सरपंचांना शासकीय योजना यशस्वीपणे लागू करण्यात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मेरी माटी मेरा देश योजनेच्या अंतर्गत 400 एनएसएस स्वयंसेवक, मायभारत योजनेचे 100 लाभार्थी आणि पीएम श्री शाळांचे विद्यार्थीही सामील होणार आहेत.

हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत मंगळवारी भारत मंडपम येथून जेएलठएन स्टेडियमपर्यंत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हर घर तिरंगा अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हिस्सा आहे. 2021 मध्ये लोकांना घरावर तिरंगा फडकविणे आणि स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते आणि आता ही एक चळवळ ठरल्याचे उद्गार धनखड यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.