For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ

06:02 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
4 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दहापैकी आघाडीवरच्या चार कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये 1 लाख 71 हजार कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजारातील 10 आघाडीवरच्या कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 71 हजार 309 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये एचडीएफसी बँक आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)यांचा वाटा सर्वाधिक राहिला होता तर दुसरीकडे 10 पैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये 78,127 कोटींची घसरण दिसून आली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कळते. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक मागच्या आठवड्यात 596 अंकांनी वाढला होता. 4 एप्रिल रोजी सेन्सेक्स निर्देशांकाने 74501 ही सर्वोच्च पातळी गाठली होती.

Advertisement

बाजार भांडवल वृद्धीचा विचार केला गेल्यास, मागच्या आठवड्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी या कंपन्यांच्या बाजारभांडवलामध्ये मागच्या आठवड्यात वाढ झाली होती. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवलात मात्र घसरण  नोंदवली गेली. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवलमूल्य मागच्या आठवड्यात 76 हजार 880 कोटी रुपयांनी वाढून 11 लाख 77 हजार 65 कोटी रुपयांवर पोहोचले होते. एलआयसीचे बाजार भांडवल 49208 कोटी वाढले असून भांडवल मूल्य 6,27,692 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 34733 कोटींनी वाढवून 14 लाख 39 हजार 836 कोटी रुपयांवर पोहोचले. एसबीआयचे बाजार भांडवल 10, 486 कोटींनी वाढून 6 लाख 82 हजार 152 कोटींवर पोहोचले होते.

Advertisement
Tags :

.