For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आझम खानसह 4 आरोपी दोषी

06:22 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
आझम खानसह 4 आरोपी दोषी
Advertisement

18 मार्चला शिक्षा जाहीर होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ रामपूर

रामपूर जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने शनिवारी डुंगरपूरमधील घरे जबरदस्तीने पाडल्याप्रकरणी माजी मंत्री आझम खान यांच्यासह चार आरोपींना दोषी ठरवले, तर अन्य तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी न्यायालय सोमवार, 18 मार्च रोजी शिक्षा सुनावणार आहे. याप्रकरणी रामपूरच्या गंज पोलीस ठाण्यात 2019 मध्ये बराच वाद आणि गदारोळ झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.

Advertisement

रामपूर एमपी-एमएलए कोर्टाचे सत्र न्यायाधीश विजय कुमार यांनी शनिवारी माजी मंत्री मोहम्मद आझम खान, नगरपालिकेचे माजी अध्यक्ष अझहर अहमद खान आणि माजी पोलीस अधिकारी (सीओ) आले हसन आणि बरकत अली यांना दोषी ठरवण्यात आले. तर इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात एकूण सात आरोपींवर जबरदस्तीने तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 447, 427, 504, 506, 395 आणि 412 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल 4 वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर हा निर्णय आला आहे.

Advertisement
Tags :

.