राज्यातील 4.9 लाख बीपीएल कार्डे रद्द
रेशन कार्डधारकांना रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने अडचणी
बेळगाव : राज्यात बीपीएल रेशनकार्डे मोठ्या प्रमाणात असल्याचे राज्यसरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे राज्यसरकार ऑपरेशन बीपीएल मोहीम राबवून राज्यातील 4 लाख 9 हजार बीपीएल कार्डे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे रद्द करण्यात आलेल्या बीपीएल रेशन कार्डधारकांना रेशनऐवजी रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने त्यांना अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अपात्र व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन करून रेशनकार्ड मिळविली होती. काही दिवसापासून राज्य सरकारने अपात्रांचा शोध घेण्याची मोहीम आखली होती. याला यश मिळून राज्यभरातील सुमारे 4 लाख 9 हजार बीपीएल रेशनकार्डे रद्द करून एपीएलमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर लाखो सदस्यांची नावेही वगळण्यात आली आहेत. हे सरकारसाठी लाभदायक असले तरी नागरिकांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहेत.
बीपीएल कार्ड रद्द केल्याने समस्या
अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या सहकार्याने अपात्र बीपीएल कार्डधारकांचा शोध घेण्यात आला. यानंतर त्यांचे बीपीएल कार्ड रद्द करण्यात आलेल्या बीपीएल कार्डधारकांमध्ये असे अनेक कुटुंबीयांना रेशन मिळत नसले तरी आरोग्य सुविधा मिळणेही अवघड झाले आहे. त्याचबरोबर अनेक सरकारी सुविधाचा लाभ त्यांना मिळणे कठीण झाले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड बंधनकारक आहे. मात्र अशा अनेक गरीब लोकांचे बीपीएल कार्ड रद्द करण्यात आल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या सहकार्याने सुरुवातीला बीपीएल कार्डधारकांची माहिती संग्रहित करण्यात आली. यानंतर वर्गवारी करून टप्प्याटप्प्याने रेशनकार्डे रद्द करण्यात आली. मात्र रद्द करण्यात आलेल्या बीपीएल कार्डधारकांमध्ये काही अल्प भूधारक शेतकरी, विविध कंपन्यामध्ये काम करणारे कर्मचारी, सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदर रद्द करण्यात आलेल्याची परिस्थिती बेताची असल्याचेही समजते. यामुळे त्यांना रेशनही नाही व आरोग्य सुविधा मिळणे अवघड होत आहे. यामुळे त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.