डिसेंबरमध्ये दिल्लीत 3×3 बास्केटबॉल स्पर्धा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे 27 आणि 28 डिसेंबर रोजी 3×3 अखिल भारतीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 50 पुरूष आणि 30 महिला असे एकूण विक्रमी 80 संघ त्यात सहभागी होतील.
ही स्पर्धा माजी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक दिवंगत हरीश शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केली जात आहे. दिल्ली बास्केटबॉल असोसिएशनशी (डीबीए) सलग्न पृथ्वी नाथ क्लब (पीएनसी) ही स्पर्धा आयोजित करीत आहे. तर डीबीए बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएफआय) नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करेल. या कार्यक्रमाला फिबा 3×3 कडून अधिकृत मान्यता देखील आहे. हा फॉरमॅट बास्केटबॉलचे भविष्य आहे आणि त्यात चपळता, प्रतिक्षेप, रणनिती आणि त्याच्या रेसिपीमधील सर्व गोष्टींचा समावेश आहे. ज्यामुळे ते रोमांचक बनते. फिबाच्या मंजुरीमुळे या स्पर्धेला तो प्रतिष्ठीत दर्जा मिळाला आहे, असे आयोजन समितीचे सहअध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सर्व बास्केटबॉल खेळाडूंसाठी आणि सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे की भविष्यकेंद्रीत या नवीन स्वरुपाला एफआयबीएची मान्यता आहे, असे ते पुढे म्हणाले. या चॅम्पियनशिपसाठी नोंदणी 12 डिसेंबरपर्यंत खुली आहे.