महापालिकेच्या तिजोरीत 39 कोटींचा घरफाळा जमा
कोल्हापूर :
महापालिकेच्या घरफाळा विभागाने सवलत योजना सुरू केल्यामुळे आतापर्यंत 39 कोटी 39 लाख 91 हजार 680 इतका घरफाळा वसूल झाला आहे. प्रशासनाने घरफाळा विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 120 कोटींचे टार्गेट दिले आहे. अद्यपी 80 कोटीची वसुली होणे बाकी असून उर्वरीत साडेचार वर्षात ती करण्याचे आव्हान घरफाळा विभागावर आहे.
जकात नाके, एलबीटी बंद झाल्यानंतर कोल्हापूर महापालिकेचे घरफाळा हे उत्पन्नाचे मुख्य स्त्राsत झाले आहे. घरफाळा वसूल झाला तरच मनपा कर्मचाऱ्यांचे पगार आणि विकासकामे करू शकणार आहे. यामुळेच महापालिकेने 100 टक्के घरफाळा वसूल होण्यासाठी सवलत योजना सुरू केली आहे. 1 एप्रिल ते 30 जून 2024 अखेर घरफाळ जमा करणाऱ्यांना 6 टक्के इतकी सवलत दिली. यामध्ये 27 कोटीहून अधिक घरफाळा जमा झाला. यानंतर 1 जुले ते 30 सप्टेंबरपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतधारकांना 4 टक्के सवलत दिली. 1 ऑक्टोंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत 2 टक्के सवलत आहे. आतापर्यंत या सवलतीमुळे 39 कोटी 39 लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. असे असले तरी गत वर्षीच्या तुलनेत 1 कोटी 45 लाखांने वसुली कमी झाली आहे. गतवषीं 108 कोटींचे टार्गेट होते. यंदा 120 कोटींचे टार्गेट असून त्यापैकी 32 टक्के वसुली झाली आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणूक कामासाठी घरफाळा विभागातील कर्मचारी गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा दावा संबंधित अधिकारी करत आहेत.
पुढील महिन्यांपासून 24 टक्के दंड
मिळकतधारकांनी घरफाळा जमा करावा म्हणून महापालिकेने सवलत योजना आणली. 1 लाख 61 हजार 570 मिळकती असून 83 हजार 446 मिळकतधारकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. उर्वरित मिळकतधारकांनी अद्यापी घरफाळा जमा केलेला नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत 2 टक्के सवलत असून 1 डिसेंबरपासून मात्र, महिन्यांला 2 टक्कयांप्रमाणे म्हणजे 24 टक्के दंडव्याज आकारणी होणार आहे.
एकूण मिळकती -1 लाख 61 हजार
यंदाचे टार्गेट -1 कोटी 20 लाख
आतापर्यंत घरफाळा जमा केलेल्या मिळकती- 83 हजार 443
सवलतीमुळे घरफाळा जमा-39 कोटी 39 लाख
थकबाकी जमा- 4 कोटी 48 लाख
दंड व्याज जमा -2 कोटी 88 लाख