For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के.पी.पाटीलांना विकासकामाच्या परीक्षेत शुन्य मार्क मिळतील

01:57 PM Nov 13, 2024 IST | Radhika Patil
के पी पाटीलांना विकासकामाच्या परीक्षेत शुन्य मार्क मिळतील
K.P. Patil will get zero marks in the development work exam.
Advertisement

आमदार प्रकाश आबीटकर : कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे पाटणकर, ढेंगेवाडी येथील प्रचारसभांना उदंड प्रतिसाद

Advertisement

कोल्हापूर :
विकासकामांचे मुल्यमापन लोकांच्या कडून होते त्यामुळे लोकांना दिशाभुल करणारे कोण आहेत ही सुज्ञ जनता जाणुन आहे त्यामुळे के.पी.पाटीलांना विकास कामांत शुन्य मार्क मिळतील असा टोला आमदार प्रकाश आबीटकर यांनी लगावला. ते कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे पाटणकर, ढेंगेवाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सुर्यवंशी, युवक नेते शिवराज खोराटे, अभय पाडळकर, राजेश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मारुती सुर्यवंशी होते. येथील सर्व सभांना उदंड प्रतिसाद मिळाला तर गावोगावी जल्लोषी स्वागत करण्यात आले.

अभय पाडळकर म्हणाले की, विकास म्हणजे आमदार प्रकाश आबीटकर हे वास्तव चित्र असुन या परिसरातील जनता त्यांना कदापि ही विसरणार नाही. धनगरवाड्यावरील जनतेला नाकारण्राया के.पी.पाटीलांना धनगरवाड्याची मते चालणार काय असा ही सवाल पाडळकर यांनी केले.

Advertisement

यावेळी संभाजीराव आरडे, युवानेते अभिषेक डोंगळे, संजय पाटील, ए.बी.पाटील सर, संदीप मगदूम, शिवाजी चौगले, विलास पाटील, मानसिंग पाटील, एकनाथ वागवेकर, कासारपुतळे येथील सिताराम खाडे, आनंदाने काळे, जयसिंग पाटील, शिवाजी पाटील, सातापा वरोटे, एम. डी. चव्हाण, बाबुराव बसरवाडकर, कासारवाडा (पा) येथील सदाशिव बानगुडे, कृष्णात फराकटे, मधुकर कांबळे, कुमार गाडीवडर, रंगराव पाडळक, रमेश हिरूगडे, लक्ष्मण आकनुरकर, सावर्डे (पा.) बबन पाटील, सरपंच सुमन मोरे, श्रीकांत गुरव उपसरपंच सुरेश परीट ग्रा. प. सदस्य वंदना गुरव संगीता सावंत शितल काशीद आनंदा कांबळे विनोद कांबळे, ढेंगेवाडी येथील बाबासो आदमापुरे, दिलीप आदमापूरे, सागर आत्मापुरे शहाजी भरकाळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटीही गेली वाहुन...
के.पीं.च्या आमदार की काळात येथे कोणतीही कामे झाली नाहीत विशेष म्हणजे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केलेल्या एका विकासकामांच्या पाटीवर के.पी.पाटील यांचे नाव होते पण ते निसर्गाला मान्य नसावे त्यामुळे ती के पी पाटील यांची पाटी ही वाहुन गेली असे पाडळकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.