महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस दरीत कोसळून 37 ठार

06:55 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील दुर्घटना, 300 फुटांपर्यंत बस गेली घरंगळत

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये प्रवासी बस 300 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या दोडा येथे बस दरी कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची माहिती देण्यात आली. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 55 प्रवासी होते. दुर्घटनास्थळी मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे.

किश्तवाडहून जम्मूकडे जाणाऱ्या बसला दोडा जिह्यातील भीषण अपघात झाला. प्रवासी बस आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 300 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. त्यानंतर मदतकार्य प्राधान्याने सुरू करण्यात आले. दोडा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, अपघातातील मृतांची संख्या 37 इतकी असून अन्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे. जखमींना किश्तवाड जिल्हा ऊग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, दोडा येथे दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना विमानाने जम्मूला हलवण्यात आले आहे.

किश्तवाडहून जम्मूकडे जाणारी बस दोडा जिल्ह्यातील अस्सार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून घसरून दुसऱ्या रस्त्यावर 300 फूट खालीपर्यंत आल्याचे पोलीस नियंत्रण कक्ष दोडामधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बसचा पार चुराडा झाला होता. घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. प्रवाशांचे मृतदेह रस्त्यावर आणि दरीमध्ये ठिकठिकणी पसरले होते. बसचे मोठे नुकसान झाल्यामुळे ती कापून मृतदेह व जखमींना बाहेर काढावे लागले.

काही जखमींना स्थानिक लोकांनी मोठ्या मुश्किलीने बाहेर काढले. जखमींना किश्तवाड जिल्हा ऊग्णालयात आणि दोडा येथील जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. बटोटे-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. बस किश्तवाडहून जम्मूला जात होती. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा चक्काचूर होऊन पलटी झाली.

पंतप्रधानांना दु:ख, मदतनिधी जाहीर

दोडा बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख ऊपये आणि जखमींना 50 हजार ऊपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. दोडा बस दुर्घटना दु:खद आहे. यामध्ये ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जम्मू बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनीही मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो असे म्हटले आहे. बाधित लोकांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article