For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोविड लसींवर केंद्राकडून 36 हजार कोटी रुपये खर्च

06:26 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोविड लसींवर केंद्राकडून 36 हजार कोटी रुपये खर्च
Advertisement

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची संसदेत माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरात कोविड-19 लसीचे 220 कोटींहून अधिक डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत दिली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवठ्यासाठी कोविड लसींच्या खरेदीवर अंदाजे 36 हजार 398 कोटी ऊपये खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच भारताने ‘लस मैत्री’ कार्यक्रमांतर्गत 99 देशांना आणि युएनच्या दोन संस्थांना कोविड-19 लसींचे 3,012 लाखांहून अधिक डोस पाठवले आहेत.

Advertisement

देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींचे वाटप लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आले. लसीकरणाची प्रगती आणि लसींचा अपव्यय या आधारावर योग्यपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला, असे राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. राज्यांमध्ये कोविड लसींचे वितरण कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार राज्य प्रशासनाद्वारे व्यवस्थापित केले जाते.

जैवतंत्रज्ञान विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे लसींच्या संशोधन आणि विकासासाठी शैक्षणिक आणि उद्योगांना मदत केली आहे. तसेच मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत लस उत्पादकांना त्यांच्या सुविधांमध्ये लस उत्पादन वाढवण्यासाठी 158.4 कोटी ऊपयांची मदत देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोविड-19 लस विकसित करण्यासाठी सुमारे 60 कोटी ऊपये खर्च केले आहेत, अशी माहितीही संसदेत देण्यात आली.

Advertisement
Tags :

.