महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्लेतील आरोग्य शिबिरात ३५६ रुग्णांनी घेतला लाभ

05:30 PM Jan 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
featuredImage featuredImage
Advertisement

दहा जणांची शस्त्रक्रियेसाठी केली निवड

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पार पडलेल्या वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिराचा 356 रुग्णांनी लाभ घेतला तर 10 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या वैद्यकीय व दंत शिबीराचे उद्घाटन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरात शिवसेना वेंगुर्ले प्रमुख उमेश येरम, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा परब, भाजपाच्या महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळु परब तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला वैद्यकीय अधिक्षक संदिप सावंत, यांचा समावेश होता. सदर शिबीरामध्ये सचिन वालावलकर यांनी वेगुर्ला वासियांना या शिबीराचा लाभ घेण्यासाठी संबोधित केले. व उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाविषयी गौरवोद्‌गार काढले तसेच या शिबीरामध्ये इतर मान्यवरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.सदर शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. गौरव घुर्ये (भिषक), डॉ. बजराटकर (सर्जन), डॉ. आकेरकर (भिषक), डॉ. धाकोरकर (दंतव्यंगवैद्यक), डॉ. अटक आयुष), डॉ. दुधगावकर (आयुष), डॉ. योगेश गोडकर (आयुष), डॉ. मृणाल सावंत (आयुष), डॉ. सौरभ पाटील (अस्थिीरोगतज्ञ), डॉ. उबाळे (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. शाम राणे (कान, नाक, घसातज्ञ), डॉ. वाळके (बालरोगतज्ञ), डॉ. दिपाली खरात (आयुष) यांनी ३५६ रुग्णांची तपासणी करून १० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविले.या शिबीराकरीता उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदिप सावंत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन व सर्वपक्षीय पाठबळ यामुळे शिबीर यशस्वीपणे पार पाडले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #