For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सावंतवाडीतील ३५ खड्डे बुजविले

04:42 PM Sep 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सावंतवाडीतील ३५ खड्डे बुजविले
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

आठ दिवसात सावंतवाडी नगरपालिकेने सावंतवाडी बाजारपेठ व आरपीडी हायस्कूल रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात येतील असे आव्हान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने नगरपालिका प्रशासनाला दिले होते . परंतु , नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेसमोरील एकूण 35 खड्डे बुजवण्यात आले.खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी सदर खड्डे बुजवण्यासाठी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक बबन डिसोजा यांनी खडी व वाळू पुरवली तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम सिमेंट व लेबरचार्जसाठी लागणारा खर्च केला . या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा, राज्य माहिती आयोग अधिकारी सुशील चौगुले व बांधकाम व्यवसायिक दादा नग्नूर तसेच त्यांचे कामगार समीर यांचे मोठे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सावंतवाडीकरांकडून कौतुक होत आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.