कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उपवासाच्या भाजणी पिठातून 35 जणांना विषबाधा

12:57 PM Sep 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

वडूज :

Advertisement

सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. या काळात बहुतांशी महिला तसेच काहीअंशी पुरुष नवरात्राचा उपवास करतात. उपवासाच्या रेडीमेड भाजनी पिठाच्या भाकरी खाल्याने वडूज परिसरातील सुमारे 35 जणांना विषबाधा झाली आहे.

Advertisement

यापैकी अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉ. बी. जे. काटकर हॉस्पिटल तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य काही खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुधवारी दुपारपासून हा प्रकार उघडकीस आला आहे. रेडीमेड भाजणी पिठाची भाकरी खाल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांशी रुग्णांना चक्कर येणे, मळमळ होणे, हातपाय थर थर कापणे तर काही रुग्णांना उलट्या, जुलाबाचा त्रास होवू लागला आहे. अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये मांडवे येथील मिना सुनिलकुमार खाडे, शोभा शरद खाडे, सुवर्णा जिजाबा डोईफोडे, सिमा सयाजी यादव, वंदना पाटील, मारुती फडतरे, सागर फडतरे, मिना प्रवीण राऊत, सिमा सयाजी यादव, अर्चना लक्ष्मण खाडे, लक्ष्मण ज्ञानदेव खाडे, मनिषा तानाजी जाधव, सुनिता जयवंत पाटील, अलका मारुती फडतरे, सुभद्रा मारुती खरात, सुभद्रा सुगंध गुरव किरकसाल, शांता शरद पवार उंबर्डे, केदार किशोर तोडकर, संजीवनी मोहन तोडकर, अश्विनी सत्यजीत तोडकर (रा. तिघेही वडूज), गंगाबाई हणमंत निंबाळकर, शोभा प्रकाश घार्गे पळशी, लता खाडे, रंजना खाडे तडवळे, जयश्री जगन्नाथ शेटे कोकराळे, अंजना आनंदा जाधव, ऋतुजा आनंदा जाधव गुरसाळे, संगिता शिवाजी गुरव बनपुरी, माया विजय फडतरे वाकेश्वर, सुवर्णा प्रकाश पवार उंबर्डे, जयश्री रामचंद्र लोहार वडूज, वैशाली बापुराव गलंडे बोंबाळे, आक्काताई श्रीरंग मदने, रेखा रावसाहेब हिरवे गुरसाळे यांचा समावेश आहे.

यापैकी 17 रुग्णांवर डॉ. काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये, 3 रुग्णांवर वडूज ग्रामीण रुग्णालयात, 7 रुग्णांवर डॉ. मोरे यांच्या सदिच्छा क्लिनिकमध्ये तर डॉ. शुभांगी काटकर यांच्या दवाखान्यात 1 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नुस शेख, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लिला मदने यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. तसेच ते दोघे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. यापैकी अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून काहींना डिस्चार्जही मिळाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

याप्रकरणी अद्याप कोणत्याही रुग्णाने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये समक्ष जावून रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दुकानातून भाजणी पिठ खरेदी करण्यात आले त्या वैभव ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स, साई बाजार या तीन मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्न व भेसळ विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉ. काटकर हॉस्पिटलकडून एम.एल.सी. प्राप्त होताच दोषी दुकानदारांविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article