घरातच तयार केला रणगाडा
इंजिनियरिंगचे शिक्षण नसतानाही मोठी कामगिरी
जुन्या काळात इंजिनियरिंगचे शिक्षण नसतानाही मोठमोठ्या कारागिरांनी राजा-महाराजांच्या काळात अभेद्य किल्ले, वास्तू, पूल तयार केले आहेत. या वास्तू शेकडो वर्षांनंतरही टिकल्या आहे. कुठल्याही गोष्टीची निर्मिती करण्यासाठी माणसाकडे कौशल्य लागते. अलिकडेच एका अमेरिकन नागरिकाने हे सत्यात उतरविले आहे. या व्यक्तीने रणगाड्याचीच निर्मिती केली आहे.
कॅलिफोर्नियाच्या 34 वर्षीय कॅमेरॉन स्विने यांनी स्वत:च्या घराच्या परिसरातच रणगाडा तयार केला आहे. हा रणगाडा 100 वर्षे जुन्या पहिल्या महायुद्धातील रणगाड्याशी मिळताजुळता आहे. कॅमेरॉनने कधीच महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नाही तरीही केवळ 1 वर्षात त्याने हा चमत्कार केला आहे.
लाखो रुपये केले खर्च
या रणगाड्याच्या निर्मितीकरता त्याने 50 हजार डॉलर्स (40 लाख रुपयांहून अधिक) खर्च केले आहेत. कॅमेरॉन हे एका मुलाचे वडिल आहेत. त्यांना इतिहास आणि वेल्डिंगमध्ये मोठी रुची आहे. 15 वर्षे वय असताना कॅमेरॉन क्लासिक कार्सच्या निर्मितीवर काम करत होते. त्यांना इंजिनियरिंगचे फारसे ज्ञान नाही. त्यांनी स्वत: सर्व शिकून घेत स्वत:च्या कौशल्य निर्माण केले आहे.
रणगाडा तयार करण्यासाठी प्लायवूड, स्टील प्लेट, सीएनएसी प्लाज्मा टेबल, बोल्ट आणि नट त्यांनी खरेदी केले. यानंतर त्यांनी जीप एफ-16 इंजिन त्यात जोडले, हळूहळू त्यांनी रणगाड्याला आकार दिला. परंतु प्रांताच्या कायद्यानुसार या रणगाड्याला ते केवळ स्वत:च्या खासगी जमिनीतच चालवू शकतात. हा रणगाडा ट्रॅक्टरसारखा असला तरीही त्याला लुक रणगाड्याचा आहे. हा पूर्णपणे 100 वर्षे जुन्या रणगाड्याची प्रतिकृती वाटत आहे.