34 हजार वर्षे जुनी वाळवीची वसाहत
जगातील सर्वात जुनी वाळवीची वसाहत मिळाली आहे. ही पृथ्वीवरील वाळवीचे सर्वात जुने घर आहे. वाळवीची ही वसाहत हजारो वर्षांपासून पृथ्वीच्या वायुमंडळातून कार्बन शोषून घेत आहे. ही वसाहत दक्षिण आफ्रिकेत वैज्ञानिकांनी शोधली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे आजही यात वाळवी राहत आहेत. वाळवींच्या या प्राचीन घराच्या शोधाचा अहवाल सायन्स ऑफ द टोटल इनव्हॉयरमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे वाळवीची ही वसाहत 34 हजार वर्षे जुनी असल्याचे समोर आले आहे.
युरोपच्या कुठल्याही गुहेतील चित्र किंवा अखेरच्या ग्लेशियल मॅक्सिममपेक्षा हे जुने आहे. वाळवीच्या या वारुळांना दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यानजीक नामाकुआलँडमध्ये बफेल्स नदीच्या काठावर शोधण्यात आल्याचे वैज्ञानिक मिशेल फ्रान्सिस यांनी सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या भागाचा 20 टक्के हिस्सा वाळवींच्या वारुळांनी व्यापलेला आहे. आफ्रिकेचे लोक त्यांना ‘लिटिल हिल’ असे संबोधितात. आफ्रिकन भाषेत त्यांना ‘हीवेल्टजाइज’ असे नाव आहे. ही वाळवी आसपासच्या भागांमधील लाकडांन्वर आक्रमण करतात, त्यानंतर त्यातील पदार्थ स्वत:च्या वारुळांमध्ये आणून ठेवतात. हजारो वर्षांपासून या वारुळांमध्ये लाकडांमुळे कार्बनने भरलेला खजिना तयार झाला आहे.
या वारुळांमध्ये किमान 15 टन कार्बन जमा झाल्याचा अनुमान आहे. या छोट्या टेकड्यांच्या आत पाणी, माती, वायुमंडळामुळे कार्बन जमा होत असून याची रासायनिक प्रक्रिया आम्ही जाणून घेत आहोत असे मिशेल यांनी सांगितले आहे. मातीमध्ये असलेल्या मायक्रोब्स कार्बनला कॅल्शियम कार्बोनेटमध्ये बदलत आहेत. मोठ्या पावसानंतर हे कार्बोनिक अॅसिडमध्ये रुपांतरित होतात. अशाप्रकारे वायुमंडण्घ्चा कार्बन डायऑक्साइड पावसाच्या पाण्यात मिसळतो. कार्बन जमिनीच्या 3 फूट खाली जाम होत होता.