33 लाख मतदार ठरविणार 121 उमेदवारांचे भवित्वय
3 हजार 452 मतदान केंद्रावर बुधवारी मतदान : 23 नोव्हेंबर दुपारी 1 पर्यंत होणार चित्र स्पष्ट
कोल्हापूर :
जिल्ह्यातील दहा मतदार संघातील 121 उमेदवारांचे भवितव्य तब्बल 33 लाख 5 हजार 98 मतदारांच्या हातात आहेत. बुधवारी (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत दहा मतदार संघातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
विधानसभेची निवडणूकीचे प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 नंतर प्रचाराचा तोफा थंडावणार आहेत. दहा मतदारसंघामध्ये सुमारे 3452 मतदान केंद्रावर मतदानाचे नियोजन आहे. 33 लाख 5 हजार 98 मतदार मतदान करणार आहेत.
‘दक्षिण’ची मतमोजणी राजारामपुरीत
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे मतमोजणी राजारामपुरी व्ही.टी. पाटील सभागृहात आयोजित केली आहे. कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदार संघाची मतमोजणी रमणमाळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे. समर्थकांसाठी स्वतंत्र जागा निश्चित केली जाणार आहे.