For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिकोडी लोकसभा मतदारसंघात 32 तपासनाके

10:08 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिकोडी लोकसभा मतदारसंघात 32 तपासनाके
Advertisement

राज्यसीमेवर 18, जिल्हा सीमेवर 2, लोकसभा कार्यक्षेत्रात 12  तपासणी नाके : तपासनाक्यांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Advertisement

चिकोडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग व पोलीस खाते, जिल्हा प्रशासनाच्यावतीने चिकोडी लोकसभा मतदारसंघात 32 चेकपोस्ट स्थापन केले आहेत. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील 8 विधानसभा मतदारसंघात मिळून हे तपासनाके सुरू केले आहेत. सर्वाधिक तपासनाके कागवाड विधानसभा मतदारसंघात आहेत. राज्य सीमेवरील 18 व जिल्हा सीमेवरील 2 तपासनाक्यांचा समावेश आहे. तसेच लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीमध्ये बारा तपासनाके आहेत. या प्रत्येक तपासनाक्यावर 3 एसएससी अधिकारी, पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघासाठी फ्लाईंग स्कॉड, व्हिडिओ सर्व्हेलेन्स पथके स्थापन करण्यात आली आहेत. तपासनाक्यावर 3 टप्प्यात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघात 148 सेक्टर अधिकारी, 27 फ्लाईंग स्कॉड, 21 व्हिडिओ सर्व्हेलेन्स पथके नियुक्त करण्यात आली आहे.

निपाणी-कोगनोळी (महाराष्ट्र बॉर्डर) नियमित चेक पोस्ट, मुरगूड रोड राधानगरी (महाराष्ट्र बॉर्डर), अप्पाचीवाडी क्रॉस (महाराष्ट्र बॉर्डर), मांगूर क्रॉस (महाराष्ट्र बॉर्डर), बोरगाव (महाराष्ट्र बॉर्डर), चिकोडी-सदलगा चिकोडी-संकेश्वर (हालट्टी) क्रॉस, एकसंबा (महाराष्ट्र बॉर्डर), सदलगा (महाराष्ट्र बॉर्डर), चिकोडी संकेश्वर क्रॉस, अथणी तेलसंग (जिल्हा बॉर्डर), कोट्टलगी गु•ापूर रोड (महाराष्ट्र बॉर्डर), कोहळ्ळी चेक पोस्ट, कागवाड-कागवाड मिरज रोड (महाराष्ट्र बॉर्डर), कागवाड गणेशवाडी रोड (महाराष्ट्र बॉर्डर), मंगसुळी आरगरोड (महाराष्ट्र बॉर्डर), केंपवाड शिंदेवाडी (महाराष्ट्र बॉर्डर), मदभावी खटाव सलगररोड (महाराष्ट्र बॉर्डर), बाळीगेरी जत (महाराष्ट्र बॉर्डर), रायबाग नसलापूर, कंकणवाडी, कब्बूर. हुक्केरी हिटणी क्रॉस (महाराष्ट्र बॉर्डर), बुगटे आलूर (महाराष्ट्र बॉर्डर), भैरापूर, नागनूर (संकेश्वर). यमकनमर्डी उळाग•ाr खानापूर (महाराष्ट्र बॉर्डर), द•ाr क्रॉस, कुरणी क्रॉस (चिकालगु•), शेट्टीहळ्ळी (महाराष्ट्र बॉर्डर) येथे तपासनाके तयार केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.