कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटल्यातील 32 जण निर्दोष

11:58 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने दुसरे जेएनएफसी न्यायालयाचा निकाल

Advertisement

बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटला क्रमांक 125 मधील 32 जणांची दुसरे जेएनएफसी न्यायालयाने सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने निर्दोष मुक्तता केली आहे. गुरुवार दि. 11 रोजी न्यायाधीश गुरुप्रसाद यांनी हा निकाल दिला आहे. सात खटल्यांपैकी आतापर्यंत चार खटल्यांमध्ये सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर उर्वरीत तीन खटल्यांची सुनावणी सुरू आहे. अर्जुन नागाप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत भरमाजी चिठ्ठी, ऋशेसन चंद्रकांत पाटील, सामजी बाबुराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगाप्पा धामणेकर, भैरू मनू कुंडेकर, किरण नारायण उडकेकर, मोहन मारुती कुगजी, भरमा मनोहर हलगेकर, रमेश जयराम घाडी, बाबू खाचू कणबरकर,

Advertisement

चांगाप्पा आनंद मिसाळे, मिथून चांगाप्पा शहापूरकर, सागर मारुती पाटील, किसन सांबरेकर, सूरज घाडी, विशाल अशोक टक्केकर, अमोल शिवाजी जाधव, राजू यल्लाप्पा तोपिनकट्टी, अनिल शंकर कंग्राळकर, सागर यल्लाप्पा काकतकर, संतोष रमेश मेलगे, बाबू भैरू मेलगे, मिंटो पिराजी बेकवाडकर, अरुण भोमाण्णी गोरल, राहुल अर्जुन अष्टेकर, उमेश शंकर सांबरेकर, योगेश पिराजी मजुकर, अमित कृष्णा पाटील, प्रवीण परशराम बागेवाडी सर्वजण राहणार येळ्ळूर, अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. या खटल्यातील परशराम मारुती पुंडेकर, अमर बळीराम पाटील, उदय विकास पाटील, विलास यल्लाप्पा पाटील, सागर शिवाजी कुंडेकर, रोहित सुरेश धामणेकर आणि अनिल महादेव धामणेकर या सात जणांना यापूर्वीच वगळण्यात आले आहे.

तर महेश हणमंत कानशिडे, विशाल शिवाजी गोरल, सुहास रामचंद्र पाटील यांचे निधन झाले आहे. येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक 25 जुलै 2014 रोजी जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविला होता. त्यामुळे येळ्ळूरसह सीमाभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण केली होती. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर लिहिलेला फलक का काढला असे म्हणत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घातल्याचा आरोप होता. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, तसेच पोलिसांवर दगड आणि विटा फेकून जखमी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आर. डी. मरल्लूसिद्धय्या यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी 42 जणांविरोधात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची द्वितीय जेएनएफसी न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणी दरम्यान 42 पैकी 7 जणांना खटल्यातून वगळण्यात आले तर तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे 32 जणांविरोधात खटला सुरू होता. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने सर्व 32 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. एकूण 7 खटल्यांपैकी चार खटल्यांचा निकाल लागला असून यामधील सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर उर्वरीत तीन खटल्यांची सुनावणी सुरू आहे. सर्व खटल्यांचे कामकाज अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील पाहत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article