महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जियो फायनान्शिअलला 310 कोटीचा नफा

06:39 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चौथ्या तिमाहीचा अहवाल सादर : 280 कोटींचे मिळवले उत्पन्न

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रिलायन्स समूहातील कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस यांचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला आहे. सदरच्या चौथ्या तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने 310 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीने 280 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न देखील मिळवले आहे.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस यांनी शुक्रवारी उशिरा आपला तिमाही निकाल घोषित केला आहे. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत कंपनीने 6 टक्के वाढीसह 310 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. याच दरम्यान 280 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न सदरच्या तिमाहीत कंपनीने प्राप्त केले आहे. तर दुसरीकडे एकूण व्याज उत्पन्न 418 कोटी रुपये आणि एकूण महसूल 418 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील तिसऱ्या तिमाहीत 293 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. यासोबत या कालावधीत कंपनीने 269 कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न प्राप्त केले होते.

 किती झाले बाजार भांडवल

कंपनीचे बाजार भांडवल मूल्य याच दरम्यान 2.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जियो फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचा समभाग 21 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. जुलैमध्ये रिलायन्समधून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही स्वतंत्र झाली होती.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article