For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात दरवर्षी 300 ते 400 स्तनकर्क रुग्ण

12:05 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात दरवर्षी 300 ते 400 स्तनकर्क रुग्ण
Advertisement

सहा वर्षांत एकूण 711 मृत्यूंची नोंद : चार वर्षांत 1,213 नवीन ऊग्णांची नोंद,आधुनिक जीवनशैली ठरतेय प्रमुख कारण

Advertisement

पणजी : राज्यात दरवर्षी 300 ते 400 स्तन कर्करोगी महिलांची नोंद होताना दिसत आहे. ही बाब चिंताजनक असून, गेल्या सहा वर्षांत म्हणजेच 2017 ते 2022 या कालावधीत स्तन कर्करोगामुळे राज्यात एकूण 711 महिलांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत 1,213 नवीन स्तन कर्करोगी महिलांची नोंद राज्यात झाली आहे. अशी माहिती राज्य सरकारने जारी केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. आज बदलत चाललेली जीवनशैली, चुकीचा आहार, मुलांना स्तनपान न करणे, वाढते आधुनिकिकरणाच्या नादात राज्यात स्तन कर्करोगाचा आजार पाय पसरवत चालला आहे. या आजाराबाबत आजही लाजेपोटी महिलांकडून उघडपणे बोलले जात नाही. याचाच फटका राज्यातील महिलांना बसताना दिसत आहे. पूर्वी हा आजार वयाच्या चाळीशीनंतर आढळायचा. परंतु आता 25 वर्षांनंतरच आढळताना दिसून येत आहे. महिलांच्या आरोग्याचा विचार करून महिलांसाठी आज सरकारी तसेच इतर संस्थाकडून मोफत स्तन तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सामान्य शस्त्रक्रिया विभागामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे तेथील नोंदीवरून दिसून आले आहे.

स्तनाच्या कर्करोगाबाबत प्रत्येक स्त्रीने स्वत:चे स्तन समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. स्तनाच्या कोणत्याही आजाराचे निदान करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे स्वपरिक्षण. एखाद्या महिलेला तिच्या स्तानांच्या ऊतीमध्ये थोडासा बदल  किंवा गाठ (ढेकूळ) जाणवू लागल्यास स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मॅमोग्राफीसारखी चाचणी केल्यानंतर गाठ घातक आहे याची खात्री करण्यात येते. स्तनातून कोणताही रक्ताचा दाग किंवा स्त्राव दिसला तर लक्ष दिले पाहिजे. दरम्यान, स्तनांचा कर्करोग अनुवंशिक असतो. त्यामुळे घरात या आजाराचा इतिहास असल्यास वर्षांतून एकदा मॅमोग्राफी क्रिनिंग करणे गरजेचे आहे. आज प्रगत तंत्रज्ञानामुळे स्तनांच्या कर्करोगाचे निदान करणे आणि उपचार करणे खूप सोपे झाले आहे. सुऊवातीच्या टप्प्यात लक्षणे आढळताच उपचार घेतला तर या कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करता येते. असे राज्यातील काही स्त्री रोग तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

सहा वर्षांतील झालेले मृत्यू

  • वर्ष          मृत्यू
  • 2017       86
  • 2018       130
  • 2019       107
  • 2020       116
  • 2021       140
  • 2022       132
  • एकूण        711

गेल्या चार वर्षांत स्तन कर्करोगाचे मिळालेले ऊग्ण

  • वर्ष         गोमॅको      इतर ऊग्णालये      एकूण
  • 2020       335         61            396
  • 2021       206         47           250
  • 2022       178         66           244
  • 2023       198         125           323

(नोव्हेंबर)

स्तन कर्करोगाची प्रमुख लक्षणे

  • स्तनांच्या आकारात बदल होणे.
  • स्तनाग्र जाड होणे.
  • स्तनाग्रातून न दाबता स्त्राव येणे.
  • पोट फुगू लागणे.
  • स्तनांमध्ये दुखणे.
  • स्तनांचा रंग बदलणे.

धोका कमी करण्यासाठी

  • बाळांना स्तनपान करा.
  • निरोगी वजन ठेवणे.
  • मद्यपान करू नये.
  • शारीरिदृष्ट्या सक्षम राहणे.
  • शिळे अन्न टाळणे.
  • रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर ठाळणे.
Advertisement
Tags :

.