For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एका वर्गात 30 जुळी मुलं

06:22 AM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
एका वर्गात 30 जुळी मुलं
Advertisement

चमत्कारापेक्षा कमी नाही शाळा

Advertisement

अमेरिकेच्या एका शाळेत हैराण करणारी स्थिती आहे. या शाळेच्या ग्रॅज्युएशन डेमध्ये एकाचवेळी 30 जुळी मुलं व्यासपीठावर येणार आहेत, कारण ती एकाचवेळी ग्रॅज्युएट होत आहेत. न्यूयॉर्क शहराच्या लाँग आयलँड या उपगगरातील प्लेनह्यू ओल्ड बेथपेज जॉन एफ. केनेडी हायस्कूलच्या ग्रॅज्युएशन सोहळ्यात यावेळी काही खास दृश्य दिसून येणार आहे.

जवळपास 500 विद्यार्थ्यांच्या या पासआउट बॅचपैकी 30 विद्यार्थी जुळी आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांनी परस्परांना किंडरगार्टनपासून जाणले आहे. काही मुलांचे आईवडिल जुळ्या मुलांच्या स्थानिक क्लबचे सदस्य होते आणि आजही एकत्रितपणे सुट्यांचे नियोजन करतात.

Advertisement

अनेक जुळी मुले एका ग्रूप टेक्स्ट चेनवर संलग्न असतात, यामुळे त्यांना स्वत:चे डबल फेम सांभाळण्यास मदत मिळते. जेव्हा आम्ही सर्व एकत्र असतो, तेव्हा वर्ग चमकून उठतो. आम्ही सर्वजण परस्परांसोबत सहज आहोत आणि आमच्या अनेक संयुक्त आठवणी आहेत, असे सिडनी मॉन्काने सांगितले.

परंतु या जुळया मुलांचा चेहरा एकसारखा नाही. अनेक जुळ्या भावंडांमध्ये मुलगा-मुलगी देखील आहे. काही  विद्यार्थ्यांचे जुळ्यांच्या स्वरुपात जन्माला येण्यामागे विज्ञानाची भूमिका असल्याचे मानणे आहे. यात आयव्हीएफची मदत घेतली असता, जुळी मुलं होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढत असते.

2014 आणि 2015 मध्ये येथील पासआउट क्लासमध्ये 10-10 जुळ्या जोड्या होत्या. तर पुढील वर्षीच्या बॅचमध्ये 9 जुळ्या जोड्या आहेत. तर अमेरिकेत 2017 मध्ये न्यू ट्रिपल हायस्कूल इलिनोइसने 44 जुळ्या जोड्या आणि एक ट्रिपलेटसह जागतिक विक्रम नोंदविला होता. अमेरिकेत जुळ्या मुलांची नोंद अधिक चांगल्याप्रकारे ठेवली जात असते.

Advertisement
Tags :

.