कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

30 हजार महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

11:07 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य सरकारकडून मार्गसूची जाहीर : निवडक शंभर ग्राम पंचायतींमध्ये आयोजन :  व्यवसायावर आधारित केंद्रे सुरू करणार

Advertisement

बेळगाव : ग्राम पंचायत स्तरावर स्व-साहाय्य गटामार्फत ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकारने काही योजना, उपक्रम सुरू करून त्याची अंमलबजावणीची तयारी केली आहे. निवडक शंभर ग्राम पंचायतींमध्ये महिलांच्या आकांक्षा व आवडीनुसार व्यवसायावर आधारित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सरकार पुढे आले आहे. 30 हजार महिलांना या प्रशिक्षण शिबिराचा लाभ मिळणार आहे. निवडक 100 ग्राम पंचायतींमध्ये प्रत्येकी 300 महिलांप्रमाणे गट तयार करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासंबंधी सरकारने मार्गसूची जाहीर केली आहे.

Advertisement

एकूण 100 केंद्रे सुरू करणार

ग्रामीण विकास व पंचायत राज खाते तसेच राष्ट्रीय जीवनोपाय अभियान यांच्या सहयोगाने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण महिला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, त्यांच्यात कौशल्याचा अभाव असतो. स्वयंरोजगार सुरू करावा तर भांडवल असत नाही. त्यामुळे ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये महिलांच्या आशा-आकांक्षा लक्षात घेऊन व्यवसायावर आधारित कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यातून निवडक तीन ग्राम पंचायतींप्रमाणे एकूण 29 जिल्ह्यांमधून 87 केंद्रे तसेच बेळगाव जिल्ह्यातून 7 व तुमकूर जिल्ह्यातून 6 केंद्रे याप्रमाणे एकूण 100 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कशिदा, शिवणकाम, बॅगा तयार करणे, मातीच्या गृहोपयोगी वस्तू तयार करणे, भाकरी बनवणे, मसाल्याचे पदार्थ बनवणे तसेच इतर उत्पन्न मिळवून देणारे उपक्रम केंद्रातून सुरू करता येणार आहेत.

महिलांच्या निवडीसाठी निकष

योजनेची उद्दिष्ट

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article