महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशातील 30 टक्के वनस्पतींचे बोटॅनिकल गार्डनमध्ये संवर्धन

02:08 PM Jan 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / अहिल्या परकाळे : 

Advertisement

पश्चिम घाटासह जगभरातील 1200 दुर्मीळ वनस्पतींसह औषधी वनस्पतींचे शिवाजी विद्यापीठातील बोटॅनिकल गार्डनमध्ये संवर्धन केले आहे. देशभरातील तीन गार्डनपैकी ही एक असूनही शासनाने निधी बंद केला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन स्वनिधीतून येथील जैवविविधतेचे संवर्धन करत आहे. देशभरातील 30 टक्के वनस्पती येथे असल्याने दरवर्षी दहा हजार विद्यार्थी विद्यापीठातील या बोटॅनिकल गार्डनला भेट देतात.

Advertisement

देशातील अनेक वनस्पतींच्या रूपाने असलेली नैसर्गिक समृध्दी आहे. जपण्यासाठी केंद्र शासनाने जैवविविधता संवर्धनाची मोहीम हाती घेतली. त्याचाच एक भाग म्हणजे देशातील तीन बोटॅनिकल गार्डनपैकी एक शिवाजी विद्यापीठात आहे. विद्यापीठातील साडेआठ एकरात याद्वारे दुर्मीळ वनस्पतींचे पुर्वीपासूनच संवर्धन केले जात आहे. वनस्पतीशास्त्र विभागातील लीड बोटॅनिकल गार्डनमध्ये तब्बल 1200 वनस्पतींसह दुर्मीळ औषधी वनस्पतींचे संवर्धन केले आहे. यामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. रोज एक वनस्पती पुढे येत असून त्या वनस्पतींचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे.

तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही बोटॅनिकल गार्डनची पाहणी करून अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. ही गार्डन पाहण्यासाठी जिल्ह्यातील शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या सहली येतात. येथील संशोधक विद्यार्थ्यांना वनस्पतींचे महत्व सांगून त्याच्या संवर्धनासंदर्भात माहिती देतात. पालकांनी शाळा-महाविद्यालयाच्या प्रयत्नाला कृतीची जोड दिली तर भावी पिढीसाठी ही नैसर्गिक संपत्ती संवर्धनाचे काम वेगाने होईल.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड अत्यंत महत्वाची आहे, हा संदेश जपत विद्यापीठ प्रशासनाने बोटॅनिकल गार्डनमध्ये औषधी वनस्पती वाढवून त्यांचे संवर्धन केले आहे. या आधारे केलेल्या बहुतांश संशोधनाला पेटंट मिळाली आहेत. डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्तनाच्या कॅन्सरवरील उपचारासाठी लक्ष्मीतरू या वनस्पतीवर केलेल्या संशोधनाअंती औषध तयार केले आहे. याला नुकतेच पेटंट मिळाले. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी सुगंधी वनस्पतींसंदर्भात उपकरण तयार केले, त्यालाही पेटंट मिळाले आहे. डॉ. एन. बी. गायकवाड यांनी भाताच्या नवीन वाणांचा शोध घेतला असून ते कृषी महाविद्यालयाकडे चाचणीसाठी पाठवले आहे.

वनस्पतीची प्रजात नष्ट झाली तर पुन्हा ती तयार करणे मानवाच्या हातात नाही. त्यामुळे कायमची नष्ट होणारी प्रत्येक प्रजाती संवर्धन केली पाहिजे. वनस्पतींमध्ये प्रत्येक दिवशी वाढ होत असून विद्यापीठ स्वनिधीतून वनस्पतींचे संवर्धन करत आहे. दुर्मीळ वनस्पती बोटॅनिकल गार्डनमध्ये आहेत. त्यांच्या संवर्धनामुळे परिसरात 2 डिग्री ताममान कमी जाणवते. विद्यार्थ्यांना वनस्पतींचे महत्व सांगून जनजागृती केली जाते. येथे भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे.

                                                                   - डॉ. एस. आर. यादव, ज्येष्ठ संशोधक, वनस्पतीशास्त्र

तमीळनाडूतील ब्राचीसटेल्म सिलीओलॅटम : 1

शिरोपिजिआ-भारतातील प्रजाती : 65

महाराष्ट्रातील प्रजाती : 25

संकटग्रस्त प्रजाती : 25

नारळाच्या प्रजाती : 65

सायकॅडस् प्रजाती 25

भारतातील केळी प्रजाती : 12

महाराष्ट्र गवत प्रजाती : 415

विद्यापीठ गवत प्रजाती : 150

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article