महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडगावातील फेस्ताच्या फेरीतून पालिकेला 30 लाखांचा महसूल

12:38 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : मडगावच्या जुन्या बाजारातील होली स्पिरीटच्या फेस्ताच्या फेरीतील स्टॉल्सचे वाटप करून मडगाव नगरपालिकेने सुमारे 30 लाख ऊपयांचा महसूल मंगळवारपर्यंत गोळा केली असल्याची माहिती पालिकेच्या कर विभागातील सूत्रांनी दिली. मडगाव पालिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, फेस्ताच्या फेरीतून जमा होणारा एकूण महसूल येत्या दोन दिवसांत 33 लाख ऊपयांचा आकडा पार करेल. मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी निदर्शनास आणून दिले की, एसजीपीडीएने अद्याप पालिकेला 3.5 लाख ऊपये देणे बाकी आहे. ते जोडले की, फेस्ताच्या फेरीतून मिळणारा महसूल 30 लाख ऊपयांच्या पुढे जाईल. मंगळवारपर्यंत पालिकेच्या तिजोरीत जवळपास 30 लाखांचा महसूल आला आहे. जुन्या बाजारात भरणाऱ्या फेस्ताच्या फेरीतून सरासरी 33 लाख ऊपयांचा महसूल येतो. स्टॉल वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पुढील दोन दिवसांत स्टॉल्सच्या वाटपातून महसूल आणखी वाढेल’, असे ते म्हणाले. मुख्याधिकाऱ्यांनी वास्को सप्ताहात वापरली जाणारी प्रणाली अवलंबली आहे, ज्यामध्ये विक्रेते आणि फेरीवाल्यांना ओळख पटल्यानंतर आणि पालिकेने शुल्क स्वीकारल्यानंतर फेरीतील स्टॉल दिले जातात. राज्याबाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांना स्टॉल्स परस्पर भाड्याने देण्याचे प्रकार टाळण्यासाठी मडगाव पालिकेने ही प्रणाली अवलंबली आहे. पालिकेने सोपो शुल्कासह स्टॉलसाठी 7850 ऊपये दर निश्चित केला आहे. फेस्त फेरीतील स्टॉल्सचे सोपोपोटी जास्त शुल्क आकारण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी एकंदर शुल्कामध्ये सोपो शुल्क समाविष्ट केलेले आहे, असे  मुख्याधिकाऱ्यांनी नजरेस आणून दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article