For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये 3 महिला नक्षलवादी ठार

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये 3 महिला नक्षलवादी ठार
Advertisement

शस्त्रास्त्रs हस्तगत : सुरक्षा दलांसोबत चकमक

Advertisement

वृत्तसंस्था/नारायणपूर

छत्तीसगडच्या नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर माढ येथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांदरम्यान चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs तसेच नक्षली साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्याच्या सीमेवरील माड क्षेत्रात नक्षलवाद्यांचा वावर सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि बीएसएफच्या पथकाने तेथे जात शोधमोहीम हाती घेतली होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्याने तेथे चकमक सुरू झाली, जी अद्याप सुरू आहे. सर्व जवान सुरक्षित असल्याचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराजन यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.