कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तारकर्ली समुद्रात जाणे बेतले जीवावर ; पुण्यातील ३ पर्यटक बुडाले ; दोघांचा मृत्यू

03:36 PM Feb 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मालवण - तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले हडपसर-  पुणे येथील ५ पर्यटक समुद्रात बुडाले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे . उर्वरित ३ पर्यटकांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे . ही घटना दुपारी ११ .२० वाजण्याच्या सुमारास घडली . रोहित बाळासाहेब कोळी (वय 21) रा - हडपसर , पुणे , शुभम सुनील सोनवणे (वय 22, हडपसर, पुणे) या दोन युवकांचा मृत्यू झाला असून दोन्ही पर्यटकांचे मृतदेह स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले आहेत. तर उर्वरित  कुश संतोष गदरे ( 21 रा हडपसर पुणे ) , रोहन रामदास डोंबाळे( 20 हडपसर पुणे ) ओंकार अशोक भोसले (वय 24, पुणे ) या तीन युवकांना वाचविण्यात यश आले आहे. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तात्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्या आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मयत घोषित केले. मात्र ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अधिक उपचार करण्या साठी त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी सामील होते. प्रकरणी मालवण पोलिसात तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update# malvan # tarkarli # pune
Next Article