जम्मू-काश्मीरमध्ये 3 सैनिक जखमी
06:15 AM Jun 23, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / श्रीनगर
Advertisement
जम्मू-काश्मीरमध्ये दोन अपघातांमध्ये इंडो तिबेटियन सीमा पोलिस दलाचे 3 सैनिक जखमी झाले असून अन्य 23 जणही जखमी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. हे अपघात या प्रदेशाच्या रामबन विभागात घडले आहेत. या सैनिकांना घेऊन जाणारे वाहन खारपोरा भागातील एका दरीत कोसळले. या वाहनात काही नागरीकही होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. या घटनेत काही घातपात नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दुसऱ्या एका अपघात घटनेत दोन बस एकमेकींवर आदळून 22 नागरीक जखमी झाले आहेत. ही घटना अखनूर भागात घडल्याची माहिती देण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement
Next Article