महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसप प्रदेशाध्यक्ष हत्याप्रकरणी 3 जणांना अटक

06:40 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तामिळनाडू पोलिसांकडून कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

तामिळनाडूतील बसप प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. एन. विजयकुमार, व्ही. मुकिलन आणि एन विग्नेश अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना रविवारी स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले, जेथे त्यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या आता 20 झाली आहे. याप्रकरणी एक आरोपी के. थिरुवेंगदम याचा 14 जुलै रोजी चकमकीत मृत्यू झाला होता.5 जुलै रोजी बसप प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची एका टोळीने हत्या केली होती. या हत्येनंतर राज्यात व्यापका आक्रोश निर्माण झाला होता. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्याचे म्हणत अण्णाद्रमुक समवेत अन्य विरोधी पक्षांनी या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

आर्मस्ट्राँग हे दलित समुदायाच्या हितांकरता काम करत होते. उत्तर चेन्नई भागात ते अत्यंत लोकप्रिय होते. 2006 साली आर्मस्ट्राँग हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच 2011 मध्ये त्यांनी एम.के. स्टॅलिन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article