महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

3 विवाह करणारा पाकिस्तानी खासदार हुसैन यांचा मृत्यू

07:00 AM Jun 10, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमली पदार्थांच्या सेवनाचा होता आरोप

Advertisement

वृत्तसंस्था /कराची

Advertisement

इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक आमिर लियाकत हुसैन यांचा मृत्यू झाला आहे. आमिर लियाकत हे तिसरा विवाह आणि घटस्फोटावरून वादात सापडले होते. आमिर लियाकत हुसैन हे कराचीमध्ये त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. आमिर हे 49 वर्षांचे होते. प्रारंभिक तपासात आमिर यांच्या मृत्यूमागे कुठलाच कट नसल्याचे मानले जात असले तरीही शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लियाकत हे मार्च 2018 मध्ये इम्रान यांच्या पक्षात सामील झाले होते. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमधून त्यांनी निवडणूक लढविली होती. टीव्हीवर त्यांचे शो अत्यंत लोकप्रिय होते. आमिर हे अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा आरोप त्यांची पत्नी दानिया यांनी केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article