अंतराळात मिळाल्या 3 रहस्यमय ‘रेड मॉन्स्टर’ गॅलेक्सी
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने अंतराळात तीन प्राचीन आणि रहस्यमय आकाशगंगांचा शोध लावला आहे. बिग बँगच्या काही कोटी वर्षांनी तिन्ही निर्माण झाल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत या लाल रंगात चमकत आहेत. या तिन्ही आकाशगंगा आमची आकाशगंगा म्हणजेच मिल्की वे इतक्या मोठ्या आकाराच्या आहेत. वैज्ञानिक त्यांना रेड मॉन्स्टर गॅलेक्सी संबोधित आहेत. या प्रारंभिक ब्रह्मांडपासून आतापर्यंत अस्तित्वात आहेत. प्रत्येक गॅलेक्सीचे वजन आमच्या सूर्याच्या वजनापेक्षा सुमारे 10 हजार पट अधिक आहे. या तिन्ही लाल आकाशगंगांचे वय सुमारे 1280 कोटी वर्षे आहे. म्हणजेच त्यांची निर्मिती बिग बँगच्या घटनेच्या सुमारे 100 कोटी वर्षांनंतर झाली होती. या लाल आकाशगंगांमध्ये असलेले तारे वेगाने परस्परांमध्ये सामावले आहेत. या आकाशगंगांमुळे वैज्ञानिकांना आता नव्या पद्धतीने अंतराळाचे अध्ययन करावे लागणार आहे. कारण या तिन्ही आकाशगंगांनी तारे आणि गॅलेक्सीच्या निर्मितीच्या प्रक्रियेला रहस्यमय करून टाकले आहे. त्यांच्याविषयी नेचर या नियतकालिकात अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
विशाल आकाराच्या, रहस्यमय
इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ बाथमधील अंतराळशास्त्राचे प्राध्यापक स्टिन वुइट्स यांनी या तिन्ही आकाशगंगा विशाल आकाराच्या अन् रहस्यमय असल्याचे म्हटले आहे. अंतराळातील मोठ्या सैतानाप्रमाणे या आकाशगंगा आहेत. या आकाशगंगांमुळे आम्हाला अंतराळ, तारे आणि आकाशगंगांच्या निर्मितीचे पुन्हा अध्ययन करणे भाग पाडल्याचे त्यांनी नमूद पेले आहे.
कशाप्रकारे होते निर्मिती
सर्वसाधारणपणे आकाशगंगा डार्क मॅटरच्या विशाल आकाराच्या ख•dयात तयार होत असल्याची मान्यता आहे. या ख•dयात असलेले शक्तिशाली गुरुत्वाकर्षण कुठलीही गोष्ट म्हणजेच वायू, छोटे दगड इत्यादींना स्वत:कडे खेचून घेते. मग या ताऱ्यांचा समूह तयार होतो. त्यांचे ग्रह आणि उपग्रह तयार होत असल्याचे स्टिन यांनी सांगितले आहे.
वेगाने ताऱ्यांची निर्मिती
सर्वसाधारणपणे कुठल्याही आकाशगंगेच्या निर्मितीवेळी त्याच्या आत असलेल्या 20 टक्के गॅसमुळेच ताऱ्यांची निर्मिती होते. परंतु या तिन्ही आकाशगंगांमधील 80 टक्के वायूमुळे नवे चमकदार तारे निर्माण झाले आहेत. प्राचीन अंतराळात असलेल्या या आकाशगंगा अत्यंत वेगाने ताऱ्यांची निर्मिती करत होत्या. तिन्ही आकाशगंगांना जेडब्ल्यूएसटीच्या नीयर इन्फ्रारेड कॅमेऱ्याद्वारे टिपले गेले आहे. हे यंत्र अंतराळात अधिक खोलवर पाहू शकते. तारे, आकाशगंगांचा शोध लावू शकते.