कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

3 पाय, एक डोळा असलेला सिंह

06:16 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

11 वर्षीय जॅकबची कहाणी

Advertisement

युगांडाच्या जंगलांमध्ये जॅकब नावाचा एक सिंह आहे. हा 11 वर्षांचा सिंह आहे. याचा एक पाय शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकून खराब झाला आणि तो कापावा लागला. एक डोळा देखील पाण्यातील म्हैसने खराब केला होता. आता हा सिंह अधिक काळ जगू शकणार नाही असे सर्वांचे मानणे होते. परंतु जॅकबने या सर्वांना चुकीचे ठरविले आहे. हा जॅकब अनेक वर्षांपासून जिवंत आहे आणि आता  हा सिंह शिकार करण्यास एकदम नवा आणि चलाख पद्धत अवलंबित असल्याचे वैज्ञानिकांना कळले आहे.

Advertisement

काही वर्षांपूर्वी शिकाऱ्यांनी एक सापळा लावला होता, यात जॅकबचा एक पाय अडकला. हा पाय खराब झाल्याने डॉक्टरांना तो कापावा लागला. त्यानंतर एका पाण्यातील म्हैसने शिंग मारून या सिंहाचा डोळा फोडला होता. सर्वसाधारणपणे असा जखमी सिंह मरून जातो, किंवा इतरांचे शिल्लक शिकार खातो किंवा गाय-म्हैस चोरून खात असतो. परंतु जॅकबकडे केवळ त्याचा भाऊ तिबू असून दोघेही मिळून राहतात, त्यांचा कुठलाच कळप नाही.

मागील वर्षी जॅकब आणि तिबूने जगाला चकित केले. दोन्ही भावांनी मगरींनी भरलेल्या नदीत 1.5 किलोमीटर अंतर पोहून पार केले. सिंहांचे इतके लांब पोहणे कधीच नोंदविले गेले नव्हते.

शिकार करण्याची नवी पद्धत

वैज्ञानिकांनी जॅकबच्या शिकार करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी कॅमेरे लावले. जॅकब आता धावून शिकार करत नाही, कारण तीन पायांनी तो वेगाने धावू शकत नाही. याऐवजी तो चतुरपणे काम करतो. तो आणि तिबू मिळून शिकारीला वेढा घालतात. तिबू वेगाने धावून शिकारीला जॅकबच्या दिशेने हाकलतो, जॅकब पूर्वीच लपून बसलेला असतो. शिकार नजीक येताच जॅकब त्यावर उडी घेत गळा किंवा पाठीवर हल्ला करतो. तीन पाय असूनही तो अत्यंत शक्तिशाली हल्ला करतो आणि शिकारीला पाडवितो. ही अत्यंत नवी पद्धत आहे. सिंहांमध्ये पूर्वी कधीच असे पाहिले गेले नाही. याला एम्बुश हंटिंगची नवी स्टाइल म्हटले जात आहे.

डॉक्टर अन् वैज्ञानिकांचे काय म्हणणे?

जॅकब केवळ भावाच्या मदतीने किंवा मृत प्राण्यांना खात असेल असे आम्ही मानत होतो. परंतु तो स्वत: मोठमोठी शिकार करत आहे. हा प्रकार निसर्गाची अदभूत शक्ती दाखवितो, प्राणी किती लवकर स्वत:ला बदलतात हे यातून दिसून येते असे क्वीन एलिझाबेथ नॅशनल पार्कचे संशोधक डॉ. अलेक्स ब्रॅक्सटन यांनी म्हटले आहे. जॅकबने दिव्यांगत्व यशाचा मार्ग रोखू शकत नसल्याचे सिद्ध केले आहे. त्याचे जीवन आम्हा माणसांनाही शिकविणारे असल्याचे आणखी एका तज्ञाने म्हटले आहे.

जॅकबचे वय आणि भविष्य

वयाच्या 11 व्या वर्षी बहुतांश सिंह वृद्ध होतात, परंतु जॅकब अद्यापही मजबूत आहे. पार्कचे कर्मचारी त्याची खास देखभाल करतात. इतर प्राण्यांना नुकसान होऊ नये म्हणून शिकाऱ्यांचे सापळे हटविले जात आहेत. जॅकबची कहाणी सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. तीन पायांचा राजा अशी कॉमेंट लोक करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article