For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य

06:01 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य
Advertisement

प्रासंगिक-वक्री शनिचे परिणाम

Advertisement

(विवाह गुणमिलन मालिका या लेखानंतर संपूर्ण करण्यात येईल)

मित्रहो, आपले गणित थोडे चुकतेय असे वाटत नाही का तुम्हाला? मंगळामुळे  अपमृत्यू होतो, शनिमुळे महात्रास होतो. या सगळ्या कल्पना तुमच्या डोक्मयात भरवल्या गेलेल्या आहेत असे वाटत नाही का? कुठलाही ग्रह हा तुम्हाला छळायला  आकाशात असत नाही हे एकदा तुम्हाला कळले की, बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा  आपोआप होईल. मागे म्हणालो तसे आपण केलेल्या कर्मांना दाखवणारे हे  आकाशातले ग्रह आहेत. ते फक्त दाखवतात, फळ आपलीच कर्मे आपल्याला देतात हे त्रिवार सत्य आहे हे लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्रात शनिला पापग्रह असे म्हटले आहे याचा अर्थ शनि हा पापी नाही तर आपण केलेल्या पापांना दाखवणारा  ग्रह आहे. कर्माचा सिद्धांत भूतकाळात कुणीही मोडू शकलेला नाही आणि भविष्यातही कोणी मोडू शकणार नाही. आजकालच्या युट्यूब आणि इतर सोशल मीडियामधून ज्योतिषशास्त्रातील काही संकल्पनांना उचलून मुख्यत: दोन गोष्टींच्याद्वारे तुमचा फायदा घेतला जातो. एकतर अमुक अमुक तोडगा करा  आणि करोडपती व्हा, अशा अर्थाने गाजर दाखवून किंवा लोभात पाडून आपली टीआरपी वाढवली जाते किंवा भीतीच्या माध्यमातून लाईक्स आणि सबस्क्रीप्शन    वाढवले जातात. सत्य काय आहे आणि त्याचा परिणाम काय असतो याबद्दल डिटेलमध्ये एक तर त्यांना माहीत नसते किंवा सांगत नाही.

Advertisement

29 जूनला 11.40 वा. शनिदेव वक्री झाले. 15/11/2024 रोजी ते पुन्हा मार्गी होतील. वक्री म्हणजे काय हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्याचा परिणाम काय होणार हे कसे सांगता येईल? एखादा ग्रह पत्रिकेमध्ये वक्री आहे म्हणून सांगणारे ज्योतिषी भरपूर आहेत. वक्री म्हणजे काय म्हणून विचारले तर तो ग्रह उलट्या दिशेने जात असतो असे मूर्खासारखे उत्तर दिले जाते. प्रत्येक ग्रह त्याच्या ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती फिरत आहे. आपण जिओ सेंट्रिक म्हणजे पृथ्वीला केंद्रस्थानी मानून इतर ग्रहांना पाहतो. पृथ्वीची गती दुसऱ्या ग्रहापेक्षा जास्त असेल तर तो ग्रह मागे जात असल्याचा भास होईल, इथे भास हा शब्द फार महत्त्वाचा आहे, तो ग्रह वक्री होत नाही तर मागे जाण्याचा भास होतो.  आता शनि वक्री होत आहे म्हणजे पृथ्वीची गती एका विशिष्ट पॉईंटला शनिपेक्षा जास्त असेल. आणि असे वर्षातून एकदा होतेच. म्हणून अमुक या राशींना प्रचंड फायदा होईल, अमुक या राशींना प्रचंड त्रास होईल, या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. मी परिणाम होत नाही असे अजिबात म्हटलेले नाही. लक्षात घ्या, परिणाम जरूर होतो. पण.!!!!  जरा विचार कऊया. 70 वर्षे माणसाचे सरासरी आयुष्य धरले तर साधारणपणे 19 वर्षे शनिची महादशा असते, साडेसाती नावाचा प्रकार प्रत्येक माणूस किमान दोनदा अनुभव करतो. (काही भाग्यवान तीनदा साडेसाती भोगतात!) अडीचकी किंवा ढैय्या किमान तीनदा आयुष्यात येतात. मग या हिशोबाने 19+14+9.5= आयुष्यातील जवळ जवळ 40 वर्षे किमान 60 टक्के लोक शनिच्या अमलाखाली येतात. म्हणजे 40 वर्ष त्यांचे वाईट होतेच का? नाही ना? मग घाबरायचे कशाला? या 40 वर्षात साधारण बुद्धिमत्तेचा माणूससुद्धा सांगू शकेल की, अनेक घटना अशा घडतील की, ज्या मनासारख्या असतील  आणि कित्येक घटना अशा असतील ज्या मनाविऊद्ध असतील. यालाच तर आयुष्य म्हणतो ना? ज्योतिषशास्त्र हे घाबरवण्यासाठी नाही तर काउंसिलिंगसाठी म्हणजे समुपदेशनासाठी वापरावे हा अलिखित नियम प्रत्येक ज्योतिषाने कटाक्षाने पाळावा  असे मला वाटते. ज्योतिष शास्त्रातला एक नियम आहे की जर शुभ ग्रह वक्री झाला तर तो अशुभ परिणाम देतो आणि अशुभ ग्रह वक्री झाला तर तो शुभ परिणाम देतो. ब्रृहत पराशरीमध्ये यासाठी अनेक सूत्रे दिलेली आहेत. पुढे काय घडणार आहे याची थोडी कल्पना असेल तर आपण सावध होऊ शकतो आणि  त्यानुसार वागू शकतो. ज्योतिष शास्त्राचा हा एक मुख्य फायदा आहे. ज्योतिष शास्त्रात, प्रतिगामी म्हणजे जेव्हा एखादा ग्रह पृथ्वीच्या दृष्टीकोनातून त्याच्या कक्षेत किंवा राशीचक्राद्वारे मागे सरकताना दिसतो. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती त्याच्या कक्षेत दुसरा ग्रह जातो तेव्हा असे घडते, ज्यामुळे ग्रह मागे सरकत असल्याचा ऑप्टिकल भ्रम निर्माण होतो. रेट्रोग्रेड (वक्री) ग्रहाची अवस्था तीन आठवड्यांपासून अर्ध्या वर्षापर्यंत असू शकते. प्रतिगामी ग्रहांकडे बघण्याचा ज्योतिषांचा आणि इतर लोकांचा दृष्टिकोन बराचसा नकारात्मक आहे. ज्योतिष शास्त्रात रस असलेल्या बहुतेक लोकांनी त्यांच्याबद्दल ऐकले असले तरी, ते खरोखर काय आहेत-आणि आपल्या जीवनासाठी त्यांचा काय अर्थ आहे हे फार कमी लोकांना समजते. ‘प्रतिगामी’ हा शब्द मागास गतीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. विज्ञान आपल्याला दाखवते की आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गांवर एका दिशेने फिरतात, म्हणजे मागे जाणारे ग्रह केवळ उलट दिशेने फिरताना दिसतात कारण आपण त्यांना पृथ्वीवरील आपल्या दृष्टीकोनातून पाहतो. तरीही, ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची स्पष्ट प्रतिगामी गती आवश्यक वैश्विक उलथापालथ करते असे मानले जाते. प्रत्येक ग्रह वेगळ्या गतीने फिरतो आणि विशिष्ट रीतीने आपण कसे विचार करतो, वागतो आणि अनुभवतो यावर प्रभाव टाकून, विशिष्ट वारंवारतेने कंपने करतो असे मानले जाते. जेव्हा एखादा ग्रह प्रतिगामी होतो, तेव्हा त्याची शक्ती कमी होते आणि आम्हाला आमचे पुढील मार्ग धीमे करण्यासाठी, प्रतिबिंबित करण्यासाठी आणि पुन्हा परिभाषित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्रतिगामी गतीच्या दरम्यान विसंगती आणि वाईट सवयी अनेकदा प्रकाशात आणल्या जातात, सुधारणेची क्षेत्रे हायलाइट करतात. शनि-चिकाटी, भव्य रचना आणि शिस्तीचा ग्रह आहे. शनिची प्रतिगामी गती सगळ्याच बाबतीत अंधकारमय नाही. तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न, परिश्र्रम आणि अंत:करणाने केले तर, जेव्हा तो थेट पुढे जाईल (मार्गी होईल) तेव्हा तुम्हाला चांगली परतफेड मिळेल हे निश्चित.

मेष

हा आठवडा आपल्याला उत्तम जाणार असे दिसत आहे. सर्व तऱ्हेचे फायदे आपल्याला प्राप्त होण्याची शक्मयता आहे. आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीसोबत छान वेळ जाईल. कदाचित एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचीही शक्मयता आहे. नाहीतर क्वचित भेटवस्तू म्हणून मिळण्याचीही शक्मयता आहे. मानसन्मान मिळेल. छान आनंदी रहा.

उपाय : मारुतीची उपासना करा.

वृषभ

हा आठवडा आपल्याला खर्चिक जाणार असे दिसते. सांभाळून खर्च करा. योग्य त्या ठिकाणी खर्च करा. अपव्यय नको. आपल्याला अध्यात्माकडे वळावेसे कदाचित वाटू लागेल. त्यात वाईट काहीच नाही. अध्यात्माकडे वळा. पण बुवाबाजीकडे वळू नका. परदेश वारी करण्याचाही संभव आहे. नोकरीसाठी किंवा पदव्युत्तर अभ्यासासाठी जावे लागण्याची शक्मयता आहे. त्यासाठी खर्च होऊ दे. सांभाळा.

उपाय: सद्गुरुची आराधना करा.

मिथुन

या आठवड्यात आपले मन चंचल होण्याचा संभव आहे. काळजी घ्या. मनाला ताब्यात ठेवा. जोडीदाराशी समजुतीने घ्या. मुलांकडून काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्मयता आहे. त्यांना सन्मान मिळण्याची देखील शक्मयता आहे. उगाचच चिडचिड होण्याची शक्मयता आहे. पण थोडे संयमाने वागा. तुम्हीही आनंदी रहा आणि इतरांनाही आनंद द्या.

उपाय : श्री विष्णूच्या कोणत्याही रुपाची उपासना करा.

कर्क

कुटुंबासमवेत वेळ छान जाईल. वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात काही वाटाघाटी चालू असतील तर त्यातून तुम्हाला फायदा होण्याची शक्मयता आहे. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसाचे मन जिंकण्याची कला आपल्याला चांगलीच अवगत झालेली दिसेल. काही देण्याघेण्याचा व्यवहार करत असाल तर सांभाळून आणि पूर्ण विचारांती करा. थंडीपासून स्वत:ला सांभाळा.

उपाय : कुलदैवताची उपासना करा.

सिंह

सिंह राशीचे आपण लोक पराक्रमाशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नसतो. नोकरीत असाल तर आपले काम चोख करण्यामागे आपले प्रयत्न असतील. पण या आठवड्यात आपल्याला आपली भावंडे, मित्र परिवार यांचा सहवास छान मिळणार आहे. त्यामुळे आनंदी असाल. छोट्या मोठ्या सहलीदेखील होतील. खाण्यापिण्यावर चांगलाच ताव माराल. पण सांभाळून.

उपाय : रोज शनिचे स्तोत्र पठण करा.

कन्या

आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांच्या सहवासात रहा. त्यासारखा आनंद नाही. घर, वाहन खरेदीच्या संदर्भात काही विचार करीत असाल तर पूर्ण विचारांती निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे पावले उचला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये. थोडे कष्ट घेतले तर यश नक्की असते. यावर विश्वास ठेवावा. फार विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा प्रामाणिकपणे काम करत रहा.

उपाय : रोज नियमितपणे तुळशीला पाणी घाला.

तूळ

मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांच्या अडचणींच्या वेळी त्यांना मदत करा, योग्य तो मार्ग दाखवा. लॉटरी किंवा तत्सम प्रकारातून अचानक धनलाभाचीही शक्मयता आहे. आपल्या हातून काही छोटीशी का होईना एक साहित्यकृती निर्माण होण्याची शक्मयता आहे. किंवा त्यानुरूप काही हालचाली घडू लागतील. प्रयत्न करून पहा. प्रयत्नांती परमेश्वर.

उपाय : मुक्या प्राण्यांना खाऊ घाला.

वृश्चिक

तब्येतीला सांभाळा. थंडी पावसाचे दिवस आहेत. मन अस्वस्थ राहण्याची शक्मयता आहे. थोडे चंचलही होईल. पण घाबरू नका. देवावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे आपली कामे करा. यश नक्की मिळेल. आपल्या मौल्यवान वस्तूंचे नीट जतन करा. नोकरावर अति जबाबदारी टाकू नका, अति विश्वास ठेवू नका. सांभाळून रहा. जिथे आपला मान राखला जात नाही, तिथे शक्मयतो जाऊ नका.

उपाय : हनुमान चालीसाचा पाठ नियमित करा.

धनु

ज्यांचे विवाहासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांचे विवाह निश्चित होण्याची शक्मयता आहे. जोडीदार सुंदर मिळेल. विवाहितांना जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारीत काही व्यवसाय करत असाल तर भागीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. आपल्या दैनंदिन प्राप्तीमध्ये वाढ होण्याची संभावना आहे. पण उगाच कुणाशीही पंगा घेऊ नका. नसत्या वादविवादात स्वत:चे नुकसान करून घेऊ नका.

उपाय : दत्तगुरुची आराधना करा.

मकर

स्त्राrकडून द्रव्यलाभ संभवतो. अथवा लॉटरी वगैरे सारख्या प्रकारातून धनलाभ होण्याची शक्मयता आहे. लॉटरी व्यतिरिक्त इतर व्यवहारातून पैसा मिळत असेल तर मात्र तो पैसा योग्य मार्गाने येतो की नाही हे पाह णे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या मार्गाने येणाऱ्या पैशाला स्वीकारू नका. अन्यथा पश्चातापाची पाळी येण्याची शक्मयता आहे. कोणतीतरी चिंता सतावत राहील.

उपाय : ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करा.

कुंभ

जपा तपाचरणामध्ये आठवडा छान जाईल. लांब पल्ल्याच्या तीर्थयात्रा घडण्याची शक्मयता आहे. आपल्या हातून काही परोपकाराचे काम होईल. आणि त्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळण्याची शक्मयता आहे. संतांचा सहवासही मिळण्याची शक्मयता आहे. घरातील वृद्ध मंडळींचे, वडिलांचे आशीर्वादही मिळतील. तुमच्या चांगल्या कर्माचे निश्चितपणे चांगलेच फळ मिळेल.

उपाय : कपाळाला गंधाचा टिळा लावून घरातून बाहेर पडा.

मीन

स्वतंत्र व्यवसायात असाल तर उद्योगात प्रगती संभवते. पित्याचा व्यवसाय पुढे चालवत असाल तर पित्याच्या सल्ल्याने वागा, त्याच्या अनुभवाचा फायदा करून घ्या. नक्कीच प्रगती होईल. नोकरीत असाल तर तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होऊन तुम्हाला पदोन्नती मिळण्याचा संभव आहे. आपली समाजातील प्रतिष्ठा वाढेल. एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाईल असे दिसते.

उपाय : दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिला तेल वाहा.

Advertisement
Tags :

.