कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यसभेसाठी भाजपचे 3 उमेदवार

06:35 AM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका मुस्लिमालाही संधी

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

Advertisement

भाजपने जम्मू-काश्मीरधून राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर जम्मू-काश्मीरमधील सत्तारुढ नॅशनल कॉन्फरन्सने शुक्रवारीच स्वत:चे तीन उमेदवार घोषित केले होते. तर चौथ्या जागेसाठी काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रविवारी पत्रक जारी करत पक्षाने जम्मू-काश्मीरमध्य होणाऱ्या 3 वेगवेगळ्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने अधिसूचना 01 अंतर्गत एका राज्यसभा जागेसाठी गुलाम मोहम्मद मीर यांना उमेदवारी दिली आहे. अधिसूचना 02 अंतर्गत भाजपने एका राज्यसभा जागेसाठी राकेश महाजन यांना उमेदवारी दिली आहे. तर अधिसूचना 03 मध्ये राज्यसभा जागेसाठी सतपाल शर्मा यांचे नाव जाहीर केले आहे. राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्याकडून या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.

तर विधानसभेतील स्वत:च्या संख्याबळाच्या आधारावर नॅशनल कॉन्फरन्सने तीन जागांवर यश मिळविण्याचे नियोजन चालविले आहे. तर भाजपला एक जागा सहजपणे जिंकता येणार आहे. भाजपपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सने तीन जागांवर स्वत:चे उमेदवार जाहीर केले होते. राज्यसभेची ही निवडणूक जम्मू-काश्मीरच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपने राज्यसभेतील स्वत:ची स्थिती मजबूत करण्यासाठी तिन्ही उमेदवारांवर भरवसा व्यक्त केला आहे. या उमेदवारांचा विजय पक्षाची क्षेत्रीय उपस्थिती आणि संसदेतील प्रतिनिधित्व वाढविण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.  भाजप स्वत:च्या उमेदवारांकरता समर्थन जमविण्यासाठी अन्य पक्षांच्या आमदारांना स्वत:च्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुलाम मोहम्मद मीर यांना उमेदवारी देत भाजपने  काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम समुदायामध्ये प्रभाव निर्माण करण्याची रणनीति आखल्याचे मानले जात आहे. भाजपने जम्मू-काश्मीरची राजकीय आणि सामाजिक संरचना विचारात घेत उमेदवारांची निवड केली आहे. गुलाम मोहम्मद मीर हे खोऱ्यातील तर राकेश महाजन आणि सतपाल शर्मा हे जम्मू क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article