For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलर मॅक्सिमममुळे जळले ऑस्ट्रेलियाचे 3 उपग्रह

06:28 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोलर मॅक्सिमममुळे जळले ऑस्ट्रेलियाचे 3 उपग्रह
Advertisement

ऑस्ट्रेलियाचे तीन क्यूब सॅटेलाइट्स पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत जळून नष्ट झाले आहेत. यामागील कारण सूर्याची उष्णता आहे, कारण सध्या सूर्य स्वत:च्या सोलर मॅक्सिमम फेजमध्ये आहे. म्हणजेच अधिक उष्णता, अधिक रेडिएशन, अधिक जियोमॅग्नेटिक स्टॉर्म, पृथ्वीच्या चहुबाजुला फिरत असलेल्या उपग्रहांचे यामुळे नुकसान होते.

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटीच्या बायनयर स्पेस प्रोग्रामचे तीन क्यूब उपग्रह सोलर फ्लेयरचे शिकार ठरले आहेत. म्हणजेच सूर्यातून बाहेर पडणारी उष्ण किरणे. बानयरचा अर्थ फायरबॉल होतो. परंतु बायनर पर्थच्या सर्वात पहिल्या राष्ट्रीय लोकांना देखील म्हटले जाते. त्यांच्या नावावरच अंतराळ कार्यक्रम तयार करण्यात आला होता.

हे तिन्ही उपग्रह स्वत:च्या कार्यकाळापूर्वीच नष्ट झाले आहेत. हे पृथ्वीच्या वर 2 हजार किलोमीटरच्या कक्षेपासून काहीशा कमी उंचीवर प्रदक्षिणा घालत होते. परंतु ते हळूहळू वायुमंडळाच्या नजीक येऊ लागले. बायनर-2, 3 आणि 4 ची ही स्थिती पाहून वैज्ञानिक चकित झाले आहेत. केवळ दोन महिनेच हे उपग्रह अंतराळात जिवंत राहू शकले आहेत. तर त्यांना 6 महिन्यांसाठी पाठविण्यात आले होते.

Advertisement

उपग्रह नष्ट होण्याचे कारण

वैज्ञानिकांनुसार सद्यकाळात सूर्य स्वत:च्या सोलर मॅक्सिममध्ये आहे. म्हणजेच 11 वर्षांचा हा कालावधी जेव्हा सुर्यात सर्वाधिक हालचाली घडत असतात. सौर डाग तयार होतात, त्यात मोठे विस्फोट होतात,  अधिक सौरलाटा आणि वादळं निर्माण होतात, चार्ज्ड कणांच्या लाटा बाहेर पडतात, यामुळे उपग्रहांवर थेट प्रभाव पडतो.

सोलर मॅक्सिमम म्हणजेच अधिक समस्या

केवळ उपग्रह नव्हे तर पृथ्वीवरही अधिक नॉर्दन लाइट्स दिसून येत आहे. 11 वर्षे पूर्ण होताच हे परत थंड होते. मग 11 वर्षांपर्यंत अशाप्रकारच्या हालचाली कमी होतात. सोलर मॅक्सिममची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. मॅक्सिममचा जेव्हा मध्य हिस्सा सुरू असतो, तेव्हा सूर्यातून अनेक सौरवादळं निघत असतात.

 

हवामानाची भविष्यवाणी अवघड

सूर्याच्या हवामानावरून वैज्ञानिक अधिक भविष्यवाणी करू शकत नाहीत. सध्या सोलर सायकल 25 सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून सूर्याच्या हालचाली अपेक्षेपेक्षा दीडपट अधिक होत आहेत. जे उपग्रह 1 हजार किलोमीटरच्या उंचीवर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहेत, त्यांना एक वायुमंडळीय स्वरुपात खेचले जात असते. अशा स्थितीत उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापित करून ठेवणे अवघड ठरते. यापासून वाचण्यासाठी उपग्रहांना स्वत:चे इंजिन ऑन करावे लागते, जेणेकरून ते स्वत:च्या कक्षेत राहू शकतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किंवा स्टारलिंकसोबत हे घडते. परंतु क्युब उपग्रहामध्ये ही सुविधा नसते. याचमुळे बायनर स्पेस प्रोग्रामचे तिन्ही उपग्रह जळून नष्ट झाले आहेत. आता सूर्य 2030 मध्ये सोलर मिनिममच्या दिशेने जाणार आहे.

Advertisement
Tags :

.